बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ
बस सेवेच्या एक वर्षपूर्तीनिमित्त पळशी झाशी येथे वाहन चालक वाहकांचा सत्कार!!!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस,
संग्रामपूर तालुका प्रतिनिधी,
रतन भगत
संग्रामपूर दि.५/८/२६ सविस्तर वृत्त असे की, संग्रामपूर तालुक्यातील पळशी झाशी येथे गेल्या एक वर्षापासून सुरू असलेल्या राज्य परिवहन महामंडळांच्या बससेवेच्या यशस्वी वाटचाली निमित्त चालक विजय चव्हाण व वाहक एम. आर. भटकर यांचा ग्रामपंचायत पळशी झाशी व ग्रामस्थांच्या वतीने शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
वर्षी झाशी येथे अनेक वर्ष बस सेवा बंद होती. मात्र ही सेवा पुन्हा सुरू व्हावी यासाठी ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ प्रियंका राहुल मेटांगे तसेच ग्रामस्थांनी सातत्याने पाठपुरवठा केला. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाल्यानंतर गेल्या वर्षी गावात पुन्हा लाल परी राहू लागली. सध्या पळशी झाशी येथून सकाळी आठ वाजता शेगाव कडे जाणारी बस दररोज प्रवाशांनी भरगच्च भरून जात असून याचा मोठा लाभ गावकरी विद्यार्थी तसेच राज्य परिवहन महामंडळालाही होत आहे. याशिवाय विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी सकाळी दहा वाजता ही नियमित बस सेवा उपलब्ध आहे. गेल्या एका वर्षात या बससेवेचा विद्यार्थी, शेतकरी, व्यापारी, महिला आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणात फायदा झाला असून, गावकऱ्यांनी याबद्दल समाधान व्यक्त केले. या सत्कार कार्यक्रमास मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी ग्रामस्थांनी अशी ही अपेक्षा व्यक्त केली की, पळशी झाशी येथून मुक्कामी बस सेवा सुरू करून सकाळी जळगाव जामोद साठी थेट बस सेवा उपलब्ध झाल्यास विद्यार्थी व नागरिकांची मोठी गैरसोय टाळता येईल. बस सेवा सुरू करण्यासाठी सहकार्य करणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाचे अधिकारी, जळगाव जामोद आजारातील कार्यरत सागर भाऊ कोठे, तसेच सर्व चालक वाहकांचे ग्रामपंचायत पळशी झाशी व ग्रामस्थांच्या वतीने मनःपूर्वक आभार. ही बस सेवा अशीच पुढे भविष्यात सुद्धा चालू राहून विद्यार्थी आणि सर्व गावकरी मंडळी यांना सतत अशीच सेवा देत राहो अशी अपेक्षा सर्व गावकरी मंडळी करीत आहेत.



