गुन्हेगारीमहाराष्ट्रसामाजिक

चार वर्षापासून फरार असलेल्या सराईतगुन्हेगाराला केली अटक

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

विदर्भ प्रतिनिधी श्याम पहूरकर

पोलीस स्टेशन हिवरखेड येथे सन २०१९ मध्ये दाखल असलेल्या अप नं १४२/१८ कलम ३०२, ३०७, ३२४, १४३, १४७, १४८, १४९, ५०४ भादवी सह कलम १३५ मपोका या गंभीर गुन्हयातील चार वर्षापासून फरार असलेला दधम ता. खामगाव येथील आरोपी गणेश राजु चव्हाण याला ठाणेदार सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून पोलीस हेड कॉन्सटेबल विठ्ठल चव्हाण व नाईक कॉन्सटेबल प्रविण जाधव यांनी काल दि. २०.१०.२३ रोजी दधम येथून अटक केली. गणेश राजु चव्हाण याने सन २०२२ मध्ये सुध्दा वैजनाथ पाटील रा. लाखनवाडा यांच्या शेतातून १५००० रु चे लोखंडी अँगल चोरून नेले होते व त्या गुन्हयात सुध्दा तो

फरार होता. तो चोरी सह ईतर गंभीर गुन्हे करण्याच्या सवयी चा असून गुन्हे केल्यानंतर तो गावातून फरार होवून मोठ्या शहराने राहायचा पोलीसांनी तो गावात आला असता गोपनिय माहिती काढून त्यास अटक केली आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button