जिल्हा परिषद केंद्रीय मराठी प्राथमिक शाळा पिंपळगाव काळे येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी.

“घायाळ पाखरांना पंख दिले तू,
मुक्या वेदनांना शब्द दिले तू,
तुझ्याच चेतने ने जगण्यास अर्थ आला,
युगा युगाच्या शोषितांचा उध्दार तुच केला,
हे महामानवा,तुझ कोटी कोटी प्रणाम “….
जिल्हा परिषद केंद्रीय मराठी प्राथमिक शाळा पिंपळगाव काळे येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी.
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी – प्रशांत चव्हाण बुलढाणा –
जळगाव (जा):- आज दिनांक 14 एप्रिल 2026 रोजी जिल्हा परिषद केंद्रीय मराठी प्राथमिक शाळा पिंपळगाव काळे येथे प्रज्ञासूर्य,क्रांतिसूर्य,जागतिक दर्जाचे कायदेतज्ज्ञ, उच्चविद्याविभूषित, प्रकांश पंडित, कामगारांचे लढवय्ये, स्त्रीयांचे उध्दारकर्ते, शेतकऱ्यांचे कैवारी, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री लालाभाऊ मानकर , पिंपळगाव काळे केंद्राचे केंद्रप्रमुख श्री सुधीर ठोंबरे सर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक श्री सुरडकर सर यांनी केले.
तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख व सर्व शिक्षक वृंद यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार हार अर्पण केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि शिक्षणावर आधारित होते. “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” हा त्यांचा मुख्य मंत्र होता. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, माणूस धर्मासाठी नाही तर धर्म माणसासाठी आहे, आणि अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी स्वाभिमानी व्हा, असे क्रांतिकारक विचार त्यांनी समाजाला दिले विषयावर विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन शाळेचे मुख्याध्यापक यांनी . तसेच विद्यार्थ्यांनी ही आपले मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी सर्व विद्यार्थ्यांना शाळेच्या वतीने बिस्किट पुड्याचे वाटप करण्यात आले. अशाप्रकारे यशस्वी रित्या कार्यक्रम पार पडला.
बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५व्या जयंतीनिमित्त तमाम भारतीयांना मनस्वी मंगलमय शुभेच्छा आणि महामानवाच्या कार्यास कोटी कोटी प्रणाम …*
🙏🙏🌹🌹🌹🌹🙏🙏



