महाराष्ट्र

यवतमाळ नगर परीषदेचे डोल्हारकर मुख्याधिकारी कि भाजपाचे पदाधिकारी

यवतमाळ नगर परीषदेचे डोल्हारकर मुख्याधिकारी कि भाजपाचे पदाधिकारी कारंजा तालुका प्रतिनिधी मोहम्मद सादिक कॉग्रेसच्या चंद्रशेखर चौधरी यांचा प्रश्न प्रतिनिधी यवतमाळयवतमाळ नगर परीषदेच्या ढिसाळ कारभारामुळे शहरातील नागरीक हैरान झाले आहे. पावसाळयापुर्वी करायची कामे सुध्दा अजुन सुरु झालेली नाही. साफसफाई, विजेचा प्रश्न, रस्ते यासह विविध समस्या मोठया प्रमाणात निर्माण झाल्या असतांना नगर परीषदेचे मुख्याधिकारी मात्र काहीच कारवाई करायला तयार नाही. एवढेच नव्हे तर करण्यात येणारी कामे सुध्दा टेंडर मॅनेज करुन केली जात आहे. विविध शर्ती तसेच अटी लागु करुन भाजपाच्या पदाधिका-यांना लाभ मिळवून देणारे यवतमाळ नगर परीषदेचे मुख्याधिकारी हे भाजपाचे पदाधिकारी आहेत काय? असा प्रश्न आता कॉग्रेसचे शहर अध्यक्ष चंद्रशेखर चौधरी यांनी उपस्थित केला आहे. ते यवतमाळ येथे आयोजित पत्रकार परीषदेत बोलत होते. यवतमाळ शहरातील नाले सफाई तसेच पावसाळ्यापूर्वी करावयाची कामे अद्याप सुरू झालेली नाही. जून महीना अर्धा अधिक संपत आल्याने तसेच कामे सुरु न झाल्याने शहरामध्ये नाल्यांना पुर आल्यास जिवीत हानी व नागरिकांच्या मालमत्तांचे नुकसान सुद्धा होण्याची शक्यता असल्याचे चंद्रशेखर चौधरी यांनी म्हटले आहे. मागील वर्षांच्या तुलनेत घनकचरा व्यवस्थापनाचा कंत्राट हा दुप्पट रक्कमेचा असतांना साफ-सफाई व स्वच्छता विषयक कामे अतिशय निकृष्ट दर्जाची होत आहे. करारनाम्यानुसार घंटागाडीद्वारे दरदिवशी प्रत्येक घरोघरी घंटा गाडी जाऊन ओला व सुका कचरा संकलन करणे अपेक्षीत असतांना तसे होतांना दिसत नाही. काही भागामध्ये दोन, तीन तर काही भागामध्ये पाच ते सहा दिवसा आड घंटागाडी जात आहे. त्याचप्रमाणे नाले सफाई, रस्ते स्वच्छ करणे, कचरा उचलणे, सर्व्हीस गल्या स्वच्छ करणे, मृत जनावरे उचलने इत्यादी बाबतीत परिस्थिती अत्यंत गंभीर स्वरूपाची आहे. न.प. ने दिलेल्या कंत्राटानुसार दर दिवशी २८५ अस्थाई कामगार कंत्राटदाराद्वारे पुरवून नागरीक भागातील बाजारपेठेतील नाल्या सफाई करून त्याच दिवशी १०० % मनुष्यबळ वापरून सदर कचरा उचलणे आवश्यक असताना याकडे नगर परीषद प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. निविदेमध्ये अंतर्भूत केलेली “मॅकेनाईज रोड स्विपींग” अद्याप शहरामध्ये कुठेही या माध्यमातून स्वच्छता होताना दिसून येत नाही. संबंधीत कंत्राटामध्ये समाविष्ट असलेली ३६५ दिवस कामगाराद्वारे काम करण्याची अट दुर्लक्षीत केली जात असून रविवारी काम बंद असल्याचे दिसून आले आहे. शहरामध्ये मोठ्या प्रमाणात कचरा जाळल्या जात आहे. यामध्ये प्रामुख्याने प्लॉस्टीक व पॉलीथीन असते. त्यामुळे निश्चितच पर्यावरणास धोका निर्माण होत असुन नागरिकांच्या आरोग्यास हानी पोहचत आहे. शहरातील अविकसीत भागामध्ये मोठ्या प्रमाणात कच्चे रस्ते आहे व बरेचसे डांबरीकरण झालेले रस्ते सुद्धा सुअवस्थेत नाही. त्याकरिता मुरूम व चुरी द्वारे डागडुगी करणे गरजेचे असतांनाही कामे ठप्प आहे. लोहारा रोड अतिशय खराब अवस्थेत आहे. याशिवाय शहरातील अनेक रस्त्यांची दुर्दशा झाली असतांना स्थानिक आमदार मात्र स्वतः रहिवास असलेल्या भागांमध्ये किंवा परीचीत नागरीकांच्या वसाहतीकडील रस्त्यांना प्राथमिकता देत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. शहरातील बऱ्याच ठिकाणी ह्युम पाईप फुटले असुन ते बदलविणे अत्यंत आवश्यक आहे. तशा स्वरूपाची मागणी करूनसुद्धा त्यांचे नियोजन झाले नाही. परिणामी घाण पाणी चोक-अप होऊन नागरीकांच्या घरामध्ये पाणी शिरत आहे. यामुळे दुर्गंधी सुटून नागरीकांना त्रास सहन करावा लागत आहे. परिणामी डासांचे प्रमाणसुद्धा वाढलेले आहे. शहरातील अनेक भागातील स्ट्रीट लाईट बंद अवस्थेत आहे. लहान मुले, वयोवृद्ध ज्येष्ठ नागरीक व महिलांना विरंगुळा व मनोरंजनाचे साधन असलेले बगीचे अतिशय वाईट अवस्थेत आहे. बगीच्यातील झाडे सुकलेली असुन ती भकास झालेली आहे. त्यामुळेच कामचुकार मुख्याधिका-यांची येथून बदली करण्याची मागणी कॉग्रेसने केली आहे. पत्रकार परीषदेला यवतमाळ कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रवी ढोक, ओम तिवारी, नंदु कुडमेथे, मोहसीन खान, दत्ता हाडके, सुनिल बोरकर, अजय किन्हीकर, प्राजक्त तेलगोटे उपस्थित होते.भ्रष्टाचाराचा नवा फंडाशहरातील कुणीच कंत्राटदार नियमात बसू नये याकरीता अनेक अटी व शर्ती लावून टेंडर प्रसिध्द केली जात आहे. बगीच्याच्या कामात नुकताच हा प्रकार उघडकीस आला. काही कामात तीस वर्षाचा अनुभव तर कधी तीन नगर परीषद मध्ये काम केल्याचा अनुभव मागीतल्या जात आहे. नेमकी भाजपाच्या पदाधिका-यांना कामे मिळवून देण्याकरीता हा फंडा वापरण्यात येत आहे. अर्वाच्य भाषा आणि भाईगीरीला स्थान दिले जात असल्याने मुख्याधिकारी डोल्हारकर वादाच्या भोव-यात सापडले असून त्यांची उच्चस्तरावर तक्रार करण्यात येणार आहे, वेळप्रसंगी न्यायालयात जाणार असल्याचे चंद्रशेखर चौधरी यांनी सांगीतले.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button