अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने 50% टेरिफ विरोधात एसडीओ कार्यालय समोर निदर्शने..

अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने 50% टेरिफ विरोधात एसडीओ कार्यालय समोर निदर्शने..
जी.डी रोकडे, खामगाव प्रतिनिधीखामगाव
, 13 ऑगस्ट रोजी स्थानिक एसडीओ कार्यालय समोर अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने 50% तेरी कार्ड व शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी निर्देशनी करण्यात आली. अमेरिकन सरकारने तारीफ कार्ड ची घोषणा केली असून त्याचे जागतिक व्यापारावर मोठे परिणाम होणार आहे. भारताच्या संदर्भात भारत अमेरिका व्यापार आणि अनिश्चितेच्या चक्रात सापडला आहे. उद्योजक शेतकऱ्यावर तो बोजा पडणार नसला तरी सर्वसामान्य जनता यात भरडली जाणार आहे. गेट कराराचे हे उल्लंघन तर आहेच शिवाय जगाला वेडीच धरण्याचा हा प्रकार आहे. या टेरिफ कार्ड धोरणात मार्क्सवादी कम्युनिस्ट पदाचा तीव्र विरोध असून भारत सरकारने या याबाबत तातडीने भूमिका स्पष्ट करीत अमेरिकेशी असलेल्या व्यापार तात्काळ थांबवित अमेरिकी विरोधात जागतिक पातळीवर मोहीम राबवावी अशी मागणी पक्ष करीत आहे. तसेच शेतकऱ्यांच्या काही ज्वलंत प्रश्नाकडे सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. याबाबतचे नियोजनही एचडी कार्यालयात अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने देण्यात आले यावेळी अखिल भारतीय किसान सभेचे सर्व कार्यकर्ते शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते…..



