अकोलाबुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

पात्र उमेदवारांना जागेवरच मिळणार अपॉइंटमेंट लेटर ! दि. २० जुलै रोजी डॉ गो.खे. महाविद्यालयात पार पडणार पं. दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा.

तेल्हारा

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी अकोला जिल्हा

विजय घोडे


दि.१७ जुलै २०२६ | पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा अंतर्गत पात्र उमेदवारांना जाग्यावरच मिळणारा अपॉइंटमेंट लेटर. हल्ली नोकरीच्या शोधात असलेल्या सुशिक्षित युवक-युवतींना रोजगाराची सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यासाठी डॉ. गोपाळराव खेडकर महाविद्यालय तेल्हारा येथे पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

हा मेळावा सोमवार, दि.२० जुलै २०२६ रोजी तेल्हारा जिल्हा अकोला येथे आयोजित करण्यात आला असून हा मेळावा जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र (अकोला), मॉडेल करिअर सेंटर (अकोला) आणि डॉ. गोपाळराव खेडकर महाविद्यालय (तेल्हारा) यांच्या संयुक्त विद्यमाने घेतला जात आहे.

मेळाव्याची ठळक वैशिष्ट्ये : एकूण रिक्त पदे: १३७ जागांसाठी भरती.
सहभागी कंपन्या: विविध क्षेत्रातील नामांकित १३ कंपन्यांचा सहभाग. प्रमुख नियोक्ते: वैभव बायोटेक, सहयोग मल्टिस्टेट क्रेडिट को-ऑप सोसायटी, स्पेक्ट्रम इलेक्ट्रिकल इंडस्ट्रीज, एल. अँड टी. फायनान्स, वन एशिया नेटवर्क इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक यांसारख्या कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहतील.

निवड प्रक्रिया: कंपन्यांचे प्रतिनिधी उमेदवारांची प्रत्यक्ष मुलाखत घेऊन पात्र उमेदवारांना जागेवरच नोकरीची संधी देणार आहेत.

ऑनलाईन नोंदणी कशी करावी? इच्छुक उमेदवारांनी मेळाव्यात सहभागी होण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो कराव्यात: वेबसाईट: www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या.

लॉगिन: ‘Employment’ टॅबवर क्लिक करून ‘Job Seeker’ पर्याय निवडा आणि आपल्या आय.डी-पासवर्डने साईन इन करा. मेळावा निवडा: होम पेजवरील ‘Job Fair’ पर्याय निवडून ‘अकोला’ जिल्हा निवडा. त्यानंतर २० जुलैच्या मेळाव्यावर क्लिक करा. आपली नोंदणी: रिक्त पदांच्या पात्रतेनुसार ‘Apply’ बटणावर क्लिक करून आपली नोंदणी निश्चित करा. यशस्वी नोंदणीनंतर मिळणाऱ्या रजिस्ट्रेशन स्लिपची प्रिंट काढा.

मेळाव्याचे ठिकाण: डॉ. गोपाळराव खेडकर महाविद्यालय, गाडेगाव (तेल्हारा), जि. अकोला.

कागदपत्रे: उमेदवारांनी मेळाव्याच्या दिवशी स्वतःचा बायोडाटा (रिझ्युमे), पासपोर्ट आकाराचे फोटो आणि आवश्यक ती सर्व मूळ कागदपत्रे सोबत घेऊन प्रत्यक्ष उपस्थित राहावे.

संपर्क क्रमांक: कोणत्याही अडचणीसाठी जिल्हा कौशल्य विकास कार्यालयाच्या (०७२४) – २४३३८४९ या क्रमांकावर किंवा akolarojgar@gmail.com या ई-मेलवर संपर्क साधता येईल. अकोला जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त श्री. प्रफुल्ल सु. शेळके यांनी जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवक-युवतींना या रोजगार मेळाव्याचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button