बुलढाणा
बुलढाणा जिल्ह्यातील 1420 गावांची अंतिम पैसेवारी जाहीर, जिल्ह्याची सरासरी 47% पैसेवारी बुलढाणा जिल्हा माहिती अधिकारी!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस,
प्रतिनिधी संग्रामपूर,
रतन भगत.
सविस्तर वृत्त असे की, सण 2025 -26 या खरीप हंगामासाठी बुलढाणा जिल्ह्यातील एकूण 1420 गावांचे अंतिम पैसेवारी जाहीर करण्यात आलेली आहे .जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये 50 पैसे पेक्षा कमी पैसेवारी नोंदविण्यात आली असून ,पन्नास पैशापेक्षा जास्त पैसेवारी असलेले जिल्ह्यात एकही गाव नाही .अशी माहिती जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी दिली आहे.
या तालुकानिहाय गावांच्या संख्येनुसार बुलढाणा ( 98 )गावे चिखली ( 144 )गावे देऊळगाव राजा (64) गावे मेहकर (161 )गावे लोणार (91) गावे सिंदखेडराजा (114) गावे मलकापूर (73 )गावे मोताळा ( 120 )गावे नांदुरा (112 )गावे खामगाव (१४६ )गावे शेगाव (73 )गावे जळगाव जामोद (119 )गावे आणि संग्रामपूर ( 105) गावे या सर्व तालुक्यातील एकूण 1420 गावांमध्ये पैसेवारी 50 पैसे पेक्षा खाली नोंदवण्यात आली आहे.
बुलढाणा जिल्ह्याची सरासरी पैसेवारी 47 पैसे इतकी असून चिखली, जळगाव जामोद ,व शेगाव तालुक्याची सरासरी पैसेवारी 49 पैसे तर लोणार व सिंदखेडराजा तालुक्याची पैसेवारी 45 पैसे नोंदविण्यात आली आहे. ही अंतिम पैसेवारी जाहीर झाल्यामुळे शेतकऱ्यांना पुढील शासकीय सवलतीत मदत व नुकसान भरपाई बाबत सरकारची दिशा स्पष्ट होणार आहे. अशी माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे.



