आंतरराष्ट्रीयबुलढाणामलकापूरमहाराष्ट्रमुबईराजकीयविदर्भ

दिल्लीवरून एआयसीसी काँग्रेसचे शिष्टमंडळ ॲड. बाळासाहेब आंबेडकरांच्या भेटीला!

वंचित बहुजन आघाडीशिवाय महाराष्ट्रात कोणत्याही पक्षाचे राजकारण शक्य नाही : डॉ. धैर्यवर्धन पुंडकर

मुंबई : नवी दिल्ली येथून ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांना आलेल्या एका महत्त्वपूर्ण फोननंतर राज्याच्या राजकारणात वेगवान घडामोडी घडू लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आज काँग्रेस पक्षाकडून एआयसीसीचे (AICC) सेक्रेटरी श्री. वेंकटेश आणि त्यांच्यासोबत मुंबई काँग्रेस मधील काही महत्त्वपूर्ण पदाधिकारी दादर येथील राजगृहावर ॲड. बाळासाहेब आंबेडकरांची भेट घेण्यासाठी आले होते.

या बैठकीस वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर, युवा नेते सुजात आंबेडकर तसेच पक्षासाठी धोरणात्मक काम करणारे सुमित आनंद उपस्थित होते. बैठकीदरम्यान ॲड. आंबेडकर आणि श्री. वेंकटेश हे आतल्या खोलीत सुमारे अर्धा तास चर्चा करत होते.

या चर्चेनंतर काँग्रेसकडून वंचित बहुजन आघाडीस काही प्रस्ताव देण्यात आले असल्याची माहिती राज्य उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर यांनी दिली. मात्र, हे प्रस्ताव आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी आहेत की राष्ट्रीय पातळीवरील राजकीय समी

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button