महाराष्ट्रविदर्भ

आरक्षणातील उपवर्गीकरण रद्द करा – संविधान संरक्षण समितीची मागणी; संग्रामपूर तहसीलवर मोर्चासाठी जोरदार तयारी…..!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी:- मुकिंदा गव्हांदे जळगाव जामोद

संग्रामपूर:- २२ जून २०२६
जेतवन बुद्ध विहार वरवट बकाल येथे संविधान संरक्षण समितीची महत्त्वपूर्ण बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीत अनुसूचित जाती आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या विषयावर सखोल चर्चा करण्यात आली. शासनाने घेतलेल्या उपवर्गीकरणाच्या निर्णयामुळे समाजामध्ये अस्वस्थता निर्माण झाली असून हा निर्णय तात्काळ रद्द करण्यात यावा, अशी एकमुखी मागणी बैठकीत करण्यात आली.
बैठकीत उपस्थित पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते व संविधानप्रेमी नागरिकांनी आरक्षण हा संविधानाने दिलेला हक्क असल्याचे सांगत, अनुसूचित जाती समाजाच्या एकात्मतेला बाधा पोहोचविणाऱ्या कोणत्याही निर्णयाला तीव्र विरोध करण्याचा निर्धार व्यक्त केला. उपवर्गीकरणाचा निर्णय सामाजिक न्यायाच्या मूलभूत तत्त्वांवर आघात करणारा असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. या पार्श्वभूमीवर संविधान संरक्षण समिती संग्रामपूरच्या वतीने येत्या ६ जुलै २०२६ रोजी संग्रामपूर तहसील कार्यालयावर विराट महामोर्चा काढण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. या महामोर्चामध्ये तालुक्यातील तसेच परिसरातील संविधानप्रेमी नागरिक, सामाजिक संघटना, युवक व महिला मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याची माहिती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. मोर्चाच्या माध्यमातून शासनापर्यंत समाजाच्या भावना पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात येणार असून, अनुसूचित जाती आरक्षणातील उपवर्गीकरणाचा निर्णय मागे घेण्याची ठाम मागणी करण्यात येणार आहे. तसेच संविधान आणि सामाजिक न्यायाच्या रक्षणासाठी सर्व समाजबांधवांनी एकजुटीने सहभागी व्हावे, असे आवाहनही बैठकीत करण्यात आले.
बैठकीस संविधान संरक्षण समितीचे पदाधिकारी, विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी तसेच संविधानप्रेमी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. आगामी महामोर्चाच्या नियोजनासंदर्भातही यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली……✍️

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button