बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

बुलढाणा जिल्ह्यात कोरडा दुष्काळ, जाहीर करा- राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा कार्याध्यक्ष शंतनू बोंद्रे

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी-संजय खेडेकर

चिखली- दि.१०
बुलढाणा जिल्ह्यात मागील महिनाभरापासून पावसाने दडी दिल्यानंतर जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे.
खरीप हंगामातील सर्वच पिके पावसा अभावी कोमजून गेलेली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा तोंडाशी आलेला घास हिरवल्या गेल्याची परिस्थिती निर्माण झालेली दिसत आहे.
त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांकडे विहिरी बोअरवेल किंवा धरणातील पाणी उपलब्ध आहे त्यांना योग्य विद्युत उपलब्ध नसल्याने त्यांच्याही समस्यांकडे तातडीने लक्ष देण्याची आवश्यकता आहे.
त्यांना रात्री बेरात्री अनियंत्रित वीज मिळत आहे .रात्रीच्या विजेमुळे शेतकऱ्यांना जंगली श्वापदे,साप विंचू यासारख्या गंभीर समस्याना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे दिवसा वीजपुरवठा देण्यात यावा. तसेच नादुरुस्त डीपी तात्काळ बदलून विद्युत विभागाची रखडलेली कामे पूर्ण करण्यात यावी. अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष शंतनु बोंद्रे यांनी केली आहे.
बुलढाणा जिल्ह्यात पावसाने मोठा खंड दिल्याने अनेक भागांत दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, पिकांना पाण्याअभावी मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
तेव्हा बुलढाणा जिल्ह्यात तातडीने ‘कोरडा दुष्काळ’ जाहीर करून शेतकऱ्यांसाठी दुष्काळी उपाययोजना लागू कराव्यात हीच मागणी जिल्हाधिकारी कार्यालयातून पालकमंत्री मा.मकरंद आबा पाटील यांच्याकडे दूरध्वनीद्वारे शंतनु बोंद्रे यांनी केली असता पालकमंत्री महोदयांनी जिल्हाधिकारी देवरे यांच्याशी सविस्तर चर्चा करत शेतकरी संकटात सापडू नये आणि खरीप पिकांचे नुकसान टाळता यावे .यासाठी प्रशासनाने या निवेदनाची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने उपाय योजना कराव्या असे निर्देश दिले.
सदर निवेदन देतेवेळी चिखली तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संतोष परिहार, जिल्हा उपाध्यक्ष विजय अंभोरे,बुलढाणा तालुका अध्यक्ष निलेश देठे, शहराध्यक्ष अनिल बावस्कर, सुजित देशमुख, विजय जावळे, झालटे, किशोर हेलगे, गणेश ठेंग, पुरुषोत्तम कदम, रामेश्वर इंगळे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button