बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

दुष्काळाच्या सावटातही बैलपोळ्याची परंपरा कायमदुष्काळाच्या सावटातही बैलपोळ्याची परंपरा कायमपिके करपली, बळीराजा चिंतेत; तरी वर्षभर राबणाऱ्या बैलांचा सन्मान.

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

अंढेरा प्रतिनिधी – शंकर शिवरकर

देऊळगाव राजा/अंढेरा ; तालुक्यातील अंढेरा परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने पाठ फिरवल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाअभावी खरीप पिकांची अवस्था बिकट झाली असून सोयाबीन, कापूस यासह विविध पिके करपण्याच्या मार्गावर आहेत. अशा संकटाच्या परिस्थितीतही वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पारंपरिक बैलपोळा साधेपणाने साजरा करण्यात आला.
पोळ्याच्या दिवशी शेतकऱ्यांनी बैलांना आंघोळ घालून, रंगरंगोटी व सजावट करून त्यांची विधिवत पूजा केली. अंढेरा गावातही पारंपरिक पद्धतीने पोळा साजरा करण्यात आला. यावेळी काशिनाथ देशमुख, योगेश देशमुख, संतोष देशमुख, स्वराज देशमुख व दत्ता संतोष देशमुख यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी बैलांची सजावट करून त्यांचा सन्मान केला.
एकीकडे पावसाअभावी शेतातील पिके माना टाकत आहेत, तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर चिंतेच्या रेषा स्पष्ट दिसत आहेत. आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने यंदाचा पोळा मोठ्या खर्चाऐवजी साधेपणाने साजरा करण्यात आला. मात्र, संकटाच्या काळातही शेतकरी आणि बैल यांच्यातील जिव्हाळ्याचे नाते या सणाच्या माध्यमातून प्रकर्षाने दिसून आले.
यावेळी शेतकरी संतोष विठ्ठल देशमुख यांची भेट घेऊन दुष्काळी परिस्थितीबाबत जाणून घेतले. “पाऊस नसल्याने पिकांची परिस्थिती गंभीर आहे. शेतकरी अडचणीत असला तरी बैल वर्षभर शेतात राबतात. त्यामुळे त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पोळा साजरा करणे हे आमचे कर्तव्य आहे,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
आता लवकरात लवकर पावसाचे आगमन होऊन करपण्याच्या मार्गावर असलेल्या खरीप पिकांना जीवदान मिळावे आणि बळीराजावरील संकट दूर व्हावे, अशी अपेक्षा अंढेरा परिसरातील शेतकरी व्यक्त करीत आहेत.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button