जिल्हा विकास आराख खड्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटलांनी मागविला सूचना! कृषी क्षेत्रावर लक्ष केंद्रित करणार..

जिल्हा विकास आराख खड्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटलांनी मागविला सूचना! कृषी क्षेत्रावर लक्ष केंद्रित करणार..
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
जिल्हा प्रतिनिधी
उषा इंगळे बुलढाणा
देशाची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन होण्यासाठी जिल्ह्याची बलस्थाने ओळखून जिल्हा विकास आराखडा तयार करण्यात येत आहे. यासाठी जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील जाणकारांची सूचना घ्याव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी काल, केले. जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी जिल्हा विकास आराखड्यासंदर्भात विचार विनिमय केला. यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी सुनय लाड उपस्थित होते.
डॉ .पाटील यांनी, जिल्ह्याचे बलस्थान ओळखून येत्या काळात
त्यानुसार विकासाचे नियोजन करण्यात येणार आहे. प्रामुख्याने कृषी क्षेत्रावर लक्ष केंद्रित करून त्यात सुधारणा करण्यात येणार आहे. जिल्ह्यात महत्त्वाच्या क्षेत्रात गुंतवणूक करून नागरिकांचे उत्पन्न वाढविण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. यामुळे नागरिकांचे राहणीमान सुसह्य होण्यास मदत होईल. जिल्ह्यातील कृषी, पर्यटन, पायाभूत सुविधा, सांस्कृतिक विकासासाठी या विविध क्षेत्रातील जाणकारांची मते जाणून घेण्यात येणार असल्याचे सांगितले.
जिल्ह्यातील कृषी उत्पादनावर याच ठिकाणी प्रक्रिया होणे गरजेचे आहे. त्यासाठी या ठिकाणी गुंतवणूक झाल्यास रोजगार निर्मिती होऊन आर्थिक विकास होण्यास मदत होणार आहे. तसेच जिल्ह्यात कुशल मनुष्यबळ उपलब्ध झाल्यास जिल्ह्याच्या विकासाला हातभार लागणार आहे. अशा प्रकारच्या सूचना अभ्यासकांनी नोंदवा व्यात. जिल्ह्यातील नागरिक, संस्था आणि स्थापना यात योगदान देऊ शकतील. केंद्र शासनाने सण २०४७ पर्यंत विकसित भारत करण्याचा संकल्प केला आहे.🖊️



