बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालय येथील नेत्र रुग्णाचे हाल -बेहाल….. शस्रक्रियेसाठी ताटकळत बसावे लागते आठ -आठ दिवस..

बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालय येथील नेत्र रुग्णाचे हाल -बेहाल….. शस्रक्रियेसाठी ताटकळत बसावे लागते आठ -आठ दिवस…* या समस्ये बद्दल सविस्तर आपबीती अशी की जिल्हा मुख्यायालयी बुलडाणा येथील स्थित जिल्हा सामान्य रुग्णालया जिल्हा भरातून डोळ्याच्या ऑपरेशन साठी फार मोठया प्रमाणात सामान्य गोर गरीब नागरिक विशेषता वयोवृद्ध येत असतात..अश्याच रुग्णांमध्ये खामखेड येथील वयोवृद्ध लोककलावंत शाहीर जयवंतराव गवई, कव्हळा येथील श्रीराम इंगळे हे गेल्या सात ते आठ दिवसापासून डोळ्याच्या मोतीबिंदू ऑपरेशन साठी भरती होतात…त्यांना ऑपरेशन साठी आज -उद्या करता करता आठ दिवस ताटकळत थांबावे लागलं, व या सबंधित रुग्णाने कव्हळा येथील सामाजिक कार्यकर्ते तथा सरपंच रविंद्र डाळीमकर यांच्याशी संपर्क साधला.. नंतर या सरपंचानी थेट जिल्हा सामान्य रुग्णालयातील जिल्हा शल्य चिकित्सक श्री एन. वि. तडस यांच्या शी संपर्क साधला… सी. एस साहेबांशी चर्चे नंतर लेन्सच्या अपुऱ्या पुरवठयामुळे रुग्णांना हाल सहन करावे लागत असल्याचे कळाले… सामाजिक कार्यकर्ते रविंद्र डाळीमकर यांनी ऑपरेशनसाठी लागणाऱ्या पुरेशा लेन्स ची मागणी वरिष्ठ पातळीवर केली… परंतु अद्यापर्यंत पुरेशा लेन्स उपलब्ध झाले नाही, रुग्णाचे फार हाल बेहाल होत आहे या कडे जिल्हा प्रशासनाने लक्ष घालणाची गरज आहे, यामुळे सामान्य जनतेत नाराजीचा सूर निघत आहे…



