बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

बिरसिंगपुर येथील बेघर झालेल्या अतिक्रमण धारकास मिळणार हक्काचे घर .

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी -: प्रशांत चव्हाण

बुलढाणा -: सर्व सामान्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसणारे लोकनेते” आ .संजुभाऊ गायकवाड पुन्हा ठरले बेघर कुटुंबासाठी आधारवड,
बुलढाणा तालुक्यातील मौजे बिरसिंगपूर येथे मॉडेल डिग्री कॉलेजच्या कामामुळे बेघर झालेल्या गवई कुटुंबाच्या मदतीसाठी आ.संजु गायकवाड स्वतः धावून आले. संकटात सापडलेल्या या कुटुंबाची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांनी त्यांच्या परिस्थितीची पाहणी केली व मानवतेच्या भावनेतून तात्काळ २५ हजार रुपयांची आर्थिक मदत देत भाडेतत्त्वावर राहण्याची व्यवस्था केली.
यावेळी आमदार यांनी शासन स्तरावर पाठपुरावा करून गवई कुटुंबाला लवकरात लवकर हक्काचे घर मिळवून देण्याचे आश्वासनही दिले. अचानक आलेल्या संकटात आमदार साहेब देवदूतासारखे धावून आल्याची भावना कुटुंबीयांनी व्यक्त केली.
जनतेच्या सुख-दुःखात कायम सहभागी होणारे, सामान्यांच्या अडचणी समजून घेऊन तात्काळ मदतीचा हात देणारे लोकनेते म्हणून आ संजु गायकवाड यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button