बुलढाणामहाराष्ट्र

तपोवन देवी ते आंत्रिखेडेकर रस्त्याची दयनीय अवस्था; काम सुरू न झाल्यास १ जूनपासून बेमुदत उपोषणाचा इशारा

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

चिखली…प्रतिनिधी

चिखली तालुक्यातील रोहडा व आंत्रिखेडेकर येथील शेतकरी व ग्रामस्थांनी तपोवन देवी ते आंत्रिखेडेकर तसेच रोहडा ते आंत्रिखेडेकर रस्त्याच्या दुरुस्ती व कामाच्या मागणीसाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. संबंधित रस्त्याचे काम तात्काळ सुरू न झाल्यास येत्या १ जूनपासून बेमुदत उपोषणास बसण्याचा इशारा ग्रामस्थांनी प्रशासनाला दिला आहे.

रोहडा ते आंत्रिखेडेकर रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून नागरिकांना रस्त्यावरून ये-जा करणेही कठीण झाले आहे. विशेषतः पावसाळ्यात या मार्गावरील परिस्थिती अधिक बिकट होत असल्याने शेतकरी, विद्यार्थी व नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

आंत्रिखेडेकर ते तपोवन देवी गावजोड रस्ता मंजूर असूनही अद्याप प्रत्यक्ष कामास सुरुवात करण्यात आलेली नाही. गेल्या पाच महिन्यांपासून ग्रामस्थांकडून सातत्याने पाठपुरावा सुरू असून यावर्षी आवश्यक सर्व कागदपत्रे बटणिकास अधिकाऱ्यांकडे जमा करण्यात आल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

या भागात बारमाही मजबूत रस्ता निर्माण झाल्यास दुग्ध व्यवसाय, शेती, शेळीपालन, कुक्कुटपालन, भाजीपाला उत्पादन तसेच फळबाग यांना मोठा चालना मिळून कृषी विकासाला गती मिळेल, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

सतत पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून प्रत्यक्ष कामास सुरुवात होत नसल्याने अखेर रोहडा व आंत्रिखेडेकर येथील ग्रामस्थांनी १ जूनपासून बेमुदत उपोषणाचा इशारा दिला आहे.

यावेळी राहुल टाकळकर, संजय खेडेकर, समाधान खेडेकर, नारायण चित्राने, राजेंद्र बोरकूल, विनायक खेडेकर, जयराम खेडेकर, समाधान पेंढारकर, सुभाष खेडेकर, अमोल मोरे, जयनारायण खेडेकर, गणेश पर्राड, अण्णा माळेकर, उत्तम माळेकर, नारायण खेडेकर, दगडू खेडेकर, शांताराम मोरे, रतन बभ्रूले, भीमराव तळेकर, शांतिलाल खरात, प्रताप खरात, मधुकर शेळके, सागर खरात आदी शेतकरी उपस्थित होते.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button