खानदेशखानदेशजळगावा जिल्हामहाराष्ट्ररावेर

​रावेर तालुक्यातील अजंदा गावाजवळील रेल्वे ब्रिज जवळ लुट करणाऱ्या इसमांना रावेर पोलीसांनी केली २४ तासांच्या आत अटक.

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
रावेर ता प्रतिनिधी विकास आमोदकर

​रावेर पोलिस स्टेशन येथे दि. ०५-०७-२०२६ रोजी गुरंन ३३४/२०२६ भा. न्या. संहीता कलम ३०९ (६), ३५१(२) (३), ३ (५) प्रमाणे रस्ता लुट संबधी गुन्हा दाखल होता.
​सदर गुन्हयात फिर्यादी शेख जाबीर शेख अमान वय- ४१ व्यवसाय – बांधकाम ठेकदार रा. फारुकी आजम कॉलनी, चिनावल ता. रावेर जि. जळगांव हे चिनावल येथे बांधकाम ठेकेदार असल्याने त्यांना मजुरी करीता नियमीत पणे मजुर हे लागत असतात व त्यामुळे ते इतर गावी नेहमी फिरस्ती वर असतात त्यांची ही बाब लक्षात ठेवुन त्यांना दि. ०४/०७/२०२६ रोजी मुस्तकीम नामक व्यक्तीने कॉल केला व मी आपणास दोन मजुर मिळवुन देतो असे आश्वासन दिले होते.
​त्यावरुन फिर्यादी यांनी दुसऱ्या दिवशी मुस्तकीम यास मजुर मिळतील का या बाबत विचारणा केली असता मुस्तकीम याने फिर्यादी यांना विवरा येथे बोलावुन घेतले व मजुर हे अजंदा गावी कामानिमीत्त गेले असल्याची बतावणी करुन आपण अजंदा गावी जावुन यावु असे सांगीतले.
​फिर्यादी व मुस्तकीम हे अजंदा रेल्वे पुलाजवळ गेले असता त्यांना पांढऱ्या रंगाच्या अॅक्टीवा गाडीजवळ दोन इसम उभे दिसले व मुस्तकीम याने हेच ते मजुर असुन त्यांचे कडे गाडी थांबविण्यास फिर्यादी यांना सांगीतले. फिर्यादी यांना विश्वासात घेवुन त्यांनी आपण रोजंदारी बाबत बोलुन घेवु असे सांगुन शेताच्या आत बोलाविले व त्यातील एका आरोपीताने फिर्यादी यांच्या गळयावर चाकु ठेवुन लुट करण्याच्या इरादयाने पैशांची मागणी केली. परंतु फिर्यादी यांचे कडे खिशात ५००/- रुपये च असल्याने त्यांनी ते काढुन दिले होते. वर
​रुपये असल्याने त्यांनी ते काढून दिले. त्यानंतर आरोपींनी फिर्यादी यांचा मोबाईल हिसकावून, चा पिन जबरदस्तीने विचारून एका अन्य खात्यावर वेळोवेळी ८,०००/- रुपये वळवून घेतले व तिथून पसार झाले. फिर्यादी यांच्या माहितीनुसार मुस्तकीम तसेच त्याचे दोन अज्ञात मित्रांविरुद्ध रावेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता.
​पोलीस तपास व आरोपींना अटक:
सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान अजंदा गावाजवळील तसेच शिवारातील लावलेल्या सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यात आले. परंतु, रात्रीची वेळ असल्याने आरोपींचे चेहरे अस्पष्ट येत होते व त्यांची ओळख पटत नव्हती. दरम्यान, रावेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना आरोपींच्या गाडीबाबत गुप्त बातमी मिळाली. या बातमीच्या आधारे खातरजमा करण्यासाठी रावेर पोलीस स्टेशनचे डी.बी. (DB) पथक गेले असता, आरोपी मुस्तकीम याने गुन्ह्याची कबुली दिली.
​अटक करण्यात आलेले आरोपी:
१) शेख मुस्तकीम शेख अकील (वय २२ वर्ष, रा. फतेह नगर, रावेर)
२) शेख मोईन शेख नईम (वय १९ वर्ष, रा. खिर्डी रोड, विवरा)
३) फैजल बेग हिदायत बेग (वय १९ वर्ष, रा. शंकर प्लॉट, रावेर, जि. जळगाव)
​आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल (ॲक्टिवा) क्रमांक MH19ED5580 तसेच आरोपींचे मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर गुन्ह्यातील आरोपी शेख मोईन शेख नईम हा सराईत गुन्हेगार असून, यापूर्वी देखील रावेर पोलीस स्टेशनला एका वयस्कर व्यक्तीला अशाच प्रकारे लुटल्याचा गुन्हा त्याच्यावर दाखल आहे. या आरोपींकडून अजून बरेच लुटीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. आरोपींना मा. न्यायालयात हजर केले असता, त्यांना दिनांक ०९/०७/२०२६ पर्यंत पोलीस कोठडी मिळाली असून पोलीस पुढील सखोल तपास करीत आहेत.
​मार्गदर्शक व कामगिरी करणारे पोलीस अधिकारी/अंमलदार:
सदरची कामगिरी मा. श्री. श्री

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button