राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघाच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष या अत्यंत जबाबदारीच्या पदावर मा. सुरज (भाऊ) बेलोकार

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी
हार्दिक अभिनंदन व उज्ज्वल भविष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!
राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघाच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष या अत्यंत जबाबदारीच्या पदावर मा. सुरज (भाऊ) बेलोकार यांची झालेली निवड ही संपूर्ण ओबीसी समाजासाठी अभिमानाची आणि प्रेरणादायी बाब आहे.आपल्या नेतृत्वाखाली सामाजिक न्याय, समता, संविधानिक हक्क, जातनिहाय जनगणना, शिक्षण, रोजगार आणि ओबीसी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सुरू असलेला संघर्ष अधिक व्यापक आणि प्रभावी होईल, असा दृढ विश्वास आहे.आपली जिद्द, धाडसी नेतृत्व, समाजाप्रती असलेली निष्ठा आणि न्यायासाठी सातत्याने लढण्याची वृत्ती निश्चितच युवकांना नवी दिशा देईल. आपल्या कार्यकाळात ओबीसी समाज अधिक संघटित, सक्षम आणि जागरूक होऊन आपल्या हक्कांसाठी प्रभावीपणे उभा राहील, हीच अपेक्षा.
मा. सुरज (भाऊ) बेलोकार यांना राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघाच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन!ईश्वरचरणी प्रार्थना की, आपणास उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि समाजहिताचे कार्य करण्यासाठी अखंड ऊर्जा लाभो.आपल्या पुढील सामाजिक, संघटनात्मक आणि जनहिताच्या वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा!
“सामाजिक न्याय • समता • स्वाभिमान • संविधानिक हक्क”हीच आपल्या कार्याची प्रेरणा आणि यशाचा मार्ग ठरो! पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा!



