खानदेशजळगावा जिल्हाजळगावा जिल्हामहाराष्ट्र

हरवलेल्या चिमुकल्यांना पुन्हा मिळाला घराचा आधार; जळगाव पोलिसांची संवेदनशील कामगिरी

शोध-४’ मोहिमेला जळगाव पोलिसांचे घवघवीत यश; ३६ हरवलेल्या बालकांचा लावला शोधशीर्षक

हरवलेल्या चिमुकल्यांना पुन्हा मिळाला घराचा आधार; जळगाव पोलिसांची संवेदनशील कामगिरी

जळगाव | प्रतिनिधी

हरवलेल्या बालकांचा शोध घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य पोलिसांच्या वतीने राबविण्यात आलेल्या ‘ऑपरेशन शोध-४’ मोहिमेत जळगाव जिल्हा पोलिसांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. अवघ्या पंधरा दिवसांच्या या विशेष मोहिमेदरम्यान एकूण ३६ हरवलेल्या बालकांचा शोध घेऊन त्यांना सुरक्षितपणे त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. या कामगिरीमुळे जळगाव पोलिसांच्या तत्परतेसह सामाजिक बांधिलकीचेही दर्शन घडले आहे.मा. अपर पोलीस महासंचालक (महिला व बाल अपराध प्रतिबंध विभाग) यांच्या आदेशानुसार ८ जून ते २३ जून २०२६ या कालावधीत राज्यभर ही मोहीम राबविण्यात आली. जळगाव जिल्ह्यात पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे , अपर पोलीस अधीक्षक गावित ,उप पोलिस अधिकारी नितीन गणापुरे उप अधीक्षक (गृह) प्रदीप ठाकूर आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकांनी व्यापक शोधमोहीम हाती घेतली.या मोहिमेत आश्रमशाळा, अनाथालये, रेल्वे व बस स्थानके, बाजारपेठा, हॉटेल्स, लॉज, धार्मिक स्थळे, सग्नल तसेच बालमजुरी होण्याची शक्यता असलेल्या विविध ठिकाणी तपासणी करण्यात आली. भिक्षा मागणारी, काम करणारी किंवा हरवलेली मुले आढळल्यास त्यांची ओळख पटवून त्यांना त्यांच्या पालकांपर्यंत पोहोचविण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले.या कारवाईत ३२ मुलगे आणि ४ मुली अशा एकूण ३६ बालकांचा शोध घेण्यात यश आले असून, त्यांना बाल कल्याण समितीच्या आदेशानंतर त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. त्यामुळे अनेक कुटुंबांना आपल्या हरवलेल्या मुलांचा सुखद पुनर्भेटीचा क्षण अनुभवता आला.जळगाव जिल्ह्यात सन २०१८ ते जून २०२६ या कालावधीत दाखल झालेल्या २,०२७ अपहरण प्रकरणांपैकी १,९३६ (९५.५१ टक्के) बालकांचा शोध पोलिसांनी यशस्वीरीत्या लावला असून, ही आकडेवारी जिल्हा पोलिसांच्या सातत्यपूर्ण आणि प्रभावी कार्यपद्धतीची साक्ष देणारी ठरली आहे.हरवलेल्या बालकांचा शोध घेण्याबरोबरच बालमजुरी, बाल तस्करी आणि बालकांवरील अत्याचारांना प्रतिबंध घालण्यासाठी अशा मोहिमा अधिक प्रभावीपणे राबविण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. समाजातील प्रत्येक नागरिकानेही हरवलेल्या किंवा संशयास्पद परिस्थितीत आढळणाऱ्या बालकांची माहिती तात्काळ पोलिसांना देऊन या सामाजिक उपक्रमात सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button