नाशिक

प्रेस नोट…. ✍️

*प्रेस नोट…. ✍️*

*कायदा प्रेमींचे राज्यस्तरीय अधिवेशन, कार्यशाळा व संमेलन, साक्री येथे उत्साहात संपन्न*

साक्री – काल रविवार, दिनांक – 10 मार्च 2024 रोजी कायदा प्रेमींचे राज्यस्तरीय अधिवेशन, संमेलन साक्री येथील कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृह येथे मोठ्या उत्साहात निस्वार्थी कायदा प्रेमींच्या सहभागाने अनेक कायदे व कायदेविषयक बाबींवर कायदेमय वातावरणात पार पडले. सदर संमेलनास प्रमुख मार्गदर्शक म्हणून न्यायमूर्ती, मा. श्री. वसंत शिवराम पाटील. विशेष न्यायाधीश, उच्च न्यायालय, मुंबई ( माझगाव डॉक) उपस्थित होते तर प्रमुख व्याख्याते म्हणून भारतीय राज्यघटना व भारतीय कायदे तसेच भारतीय प्रशासन व्यवस्थेचे गाढे अभ्यासक श्री. अरुण अहिरराव, कळंभीर, साक्री व ॲड. श्री. चंद्रकांत येशीराव. सदस्य जिल्हा ग्राहक निवारण मंच हे उपस्थित होते. त्याबरोबरच सदर संमेलनात माहिती अधिकार कायद्यावर श्री. गणेश अशोक शिंदे, माहितीचा अधिकार अधिनियम, राष्ट्रीय प्रवीण प्रशिक्षक यांचे मार्गदर्शन लाभले तर श्री शुभराज गजरे, वर्धा यांनी माहिती अधिकार कायद्याची अंमलबजावणी हेतू कार्यकर्त्यांना महत्त्वपूर्ण मार्गदर्शन व सूचना केल्या. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मा. न्यायमूर्ती श्री. वसंत शिवराम पाटील, श्री. अरुण अहिरराव, ॲड. श्री चंद्रकांत येशीराव, यांच्या हस्ते भारतीय संविधानाचे पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. सदर संमेलनात श्री. अरुण अहिरराव यांनी भारतीय राज्यघटना व भारतीय कायद्यांसह भारतीय व्यवस्था यावर अगदी सहज सोप्या पद्धतीत प्रशासकीय व्यवस्थेतील, कमतरता, सुधारणा यावर उदाहरणांसह विविध प्रमाणके मांडून सर्व कायदाप्रेमींसह सुजाण नागरिकांना व्याख्यान देत दुपार नंतरच्या चर्चासत्रामध्येसुद्धा कार्यकर्ते कायदाप्रेमी नागरिकांशी संवाद करत महत्वपूर्ण मार्गदर्शन केले. ग्राहक संरक्षण कायद्यावर ॲड. श्री. चंद्रकांत येशीराव, यांनी ग्राहक संरक्षण कायदा व या कायद्यामधील ग्राहकांचे अधिकार, सुरक्षा यावर महत्वपूर्ण व्याख्यान दिले सदर व्याख्यानात त्यांनी केंद्रीय ग्राहक आयोगासह माननीय उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयांच्या काही न्यायनिर्णया मधून ग्राहकांचे किराणा दुकान पासून तर मॉल व सोनाराच्या दुकानापर्यंत तसेच वकील पासून तर डॉक्टर पर्यंत सेवा देणारे सर्व वर्गातील ग्राहकांचे अधिकार अगदी सोप्या पद्धतीत समजावून सांगितले व सहभागी कार्यशाळेतील सर्व कायदा प्रेमींनी उपस्थित केलेल्या प्रश्नांचे उत्तर देत सर्व प्रश्नांचे समाधान केले. त्यापुढे श्री. शुभराज गजरे, श्री. गणेश शिंदे. श्री. विठोबा द्यानद्यान, श्री. आर. के. मामा. सौ. जयश्री गोळेचा. ॲड. श्री. शरद भदाणे. व इतर अनुभवी कायदा प्रेमींनी माहिती अधिकार कायदा, लोकसेवा हक्क कायदा, दप्तर दिरंगाई कायद्यासह इतर कायद्यांवर महत्वपूर्ण असे मार्गदर्शन केले. व सूचना दिल्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष न्यायमूर्ती श्री. वसंत शिवराम पाटील. यांनी माहिती अधिकार कायदा व न्यायालयीन प्रक्रिया याबाबत महत्वपूर्ण ज्ञानदान करून मार्गदर्शन केले. त्याबरोबरच त्यांनी सर्व कायदा प्रेमी व नागरिकांना केलेल्या सूचनेप्रमाणे या अधिवेशनात शासन प्रशासनात पारदर्शकता व उत्तरदायित्व निर्माण करून भ्रष्टाचार मुक्त सुव्यवस्था निर्माण करण्यासाठी महत्वपूर्ण विषयांवर ॲड. श्री. चंद्रकांत येशीराव यांनी ठराव मांडले व त्यास श्री. हिम्मत ठाकूर, धुळे यांनी कायदा प्रेमी तर्फे अनुमोदन देत ठराव पास करण्यात आले. सदर अधिवेशनात साक्री येथे महाराष्ट्रातील वर्धा, नांदेड, नाशिक, जळगाव, ठाणे, मुंबई, पुणे, रायगड अशा अनेक जिल्ह्यातून निस्वार्थी कायदा प्रेमींनी उपस्थिती लावून अधिवेशनात स्वागत मूल्यासह सक्रिय सहभाग घेतला. त्याबरोबरच धुळे जिल्ह्यातील व साक्री तालुक्यातील अनेक सुजाण जागरूक नागरिकांनी, पत्रकार बांधवांनी कार्यशाळेत सहभाग नोंदविला. सदर संमेलनाचे आयोजन कायदा प्रेमी निलेश तोरवणे, सुरेंद्र भदाणे सह महाराष्ट्रातील कायदा प्रेमींनी केले होते. तर सदरचे अधिवेशन यशस्वी पार पाडण्यासाठी मालेगाव, सटाणा, धुळे, शिरपूर , साक्री, नाशिक, चांदवड येथील कायदाप्रेमींनी विशेष सहकार्य करून आपला सहभाग नोंदविला. कायदा प्रेमींचे राज्यस्तरीय अधिवेशनात विशेष लक्षणीय बाब म्हणजे शिरपूर तालुक्यातील बलकुवे येथील ह.भ.प. भिकन लकडू बोरसे, कीर्तनकार महाराज, (वय 75 ) यांनी स्वयंप्रेरणेने सदर अधिवेशनात सहभाग घेऊन कायद्याविषयी कार्यकर्त्यांना महत्त्वपूर्ण मार्गदर्शन व सूचना दिल्या. ते मंचावरून व्यक्त होण्याआधी त्यांच्या वयोमानावरून आणि त्यांच्या पेहराववरून त्यांना कायद्याचे एवढे ज्ञान असेल असे उपस्थितांना वाटले नव्हते. या निस्वार्थी भ्रष्टाचार मुक्त राष्ट्र बनवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या कायदा प्रेमींच्या मेळाव्यात चांदवड तालुक्यातील गोळेचा दांपत्यचा सक्रिय सहभाग व भ्रष्टाचार मुक्त व्यवस्थेसाठी असलेली तळमळ, उठून दिसत होती. त्यामुळे श्री. गोळेचा सर व सौ जयश्री गोळेचा या निस्वार्थी कायदा प्रेमी जोडीचे सर्व उपस्थित कौतुक करत होते. कार्यक्रमाच्या शेवटी कार्यक्रमाचे आयोजक श्री. निलेश तोरवणे व सुरेंद्र भदाणे यांनी उपस्थित मार्गदर्शक, व्याख्याते, मान्यवर कायदाप्रेमी यांचे आभार व्यक्त केले. यावेळी सर्व कायदा प्रेमींनी भ्रष्टाचार मुक्त राष्ट्र बनवण्यासाठी काम करण्याचा निर्धार करत पुढील संमेलनाचे लवकरच आयोजन करून कायद्याच्या जनजागृतीला अजून वेग देण्याच्या निर्णय उपस्थितांनी केला.कायदा प्रेमींचे राज्यस्तरीय अधिवेशन, कार्यशाळा व संमेलन, साक्री येथे उत्साहात संपन्न

साक्री – काल रविवार, दिनांक – 10 मार्च 2024 रोजी कायदा प्रेमींचे राज्यस्तरीय अधिवेशन, संमेलन साक्री येथील कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृह येथे मोठ्या उत्साहात निस्वार्थी कायदा प्रेमींच्या सहभागाने अनेक कायदे व कायदेविषयक बाबींवर कायदेमय वातावरणात पार पडले.
सदर संमेलनास प्रमुख मार्गदर्शक म्हणून न्यायमूर्ती, मा. श्री. वसंत शिवराम पाटील. विशेष न्यायाधीश, उच्च न्यायालय, मुंबई ( माझगाव डॉक) उपस्थित होते तर प्रमुख व्याख्याते म्हणून भारतीय राज्यघटना व भारतीय कायदे तसेच भारतीय प्रशासन व्यवस्थेचे गाढे अभ्यासक श्री. अरुण अहिरराव, कळंभीर, साक्री व ॲड. श्री. चंद्रकांत येशीराव. सदस्य जिल्हा ग्राहक निवारण मंच हे उपस्थित होते. त्याबरोबरच सदर संमेलनात माहिती अधिकार कायद्यावर श्री. गणेश अशोक शिंदे, माहितीचा अधिकार अधिनियम, राष्ट्रीय प्रवीण प्रशिक्षक यांचे मार्गदर्शन लाभले तर श्री शुभराज गजरे, वर्धा यांनी माहिती अधिकार कायद्याची अंमलबजावणी हेतू कार्यकर्त्यांना महत्त्वपूर्ण मार्गदर्शन व सूचना केल्या.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मा. न्यायमूर्ती श्री. वसंत शिवराम पाटील, श्री. अरुण अहिरराव, ॲड. श्री चंद्रकांत येशीराव, यांच्या हस्ते भारतीय संविधानाचे पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
सदर संमेलनात श्री. अरुण अहिरराव यांनी भारतीय राज्यघटना व भारतीय कायद्यांसह भारतीय व्यवस्था यावर अगदी सहज सोप्या पद्धतीत प्रशासकीय व्यवस्थेतील, कमतरता, सुधारणा यावर उदाहरणांसह विविध प्रमाणके मांडून सर्व कायदाप्रेमींसह सुजाण नागरिकांना व्याख्यान देत दुपार नंतरच्या चर्चासत्रामध्येसुद्धा कार्यकर्ते कायदाप्रेमी नागरिकांशी संवाद करत महत्वपूर्ण मार्गदर्शन केले.
ग्राहक संरक्षण कायद्यावर ॲड. श्री. चंद्रकांत येशीराव, यांनी ग्राहक संरक्षण कायदा व या कायद्यामधील ग्राहकांचे अधिकार, सुरक्षा यावर महत्वपूर्ण व्याख्यान दिले सदर व्याख्यानात त्यांनी केंद्रीय ग्राहक आयोगासह माननीय उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयांच्या काही न्यायनिर्णया मधून ग्राहकांचे किराणा दुकान पासून तर मॉल व सोनाराच्या दुकानापर्यंत तसेच वकील पासून तर डॉक्टर पर्यंत सेवा देणारे सर्व वर्गातील ग्राहकांचे अधिकार अगदी सोप्या पद्धतीत समजावून सांगितले व सहभागी कार्यशाळेतील सर्व कायदा प्रेमींनी उपस्थित केलेल्या प्रश्नांचे उत्तर देत सर्व प्रश्नांचे समाधान केले. त्यापुढे श्री. शुभराज गजरे, श्री. गणेश शिंदे. श्री. विठोबा द्यानद्यान, श्री. आर. के. मामा. सौ. जयश्री गोळेचा. ॲड. श्री. शरद भदाणे. व इतर अनुभवी कायदा प्रेमींनी माहिती अधिकार कायदा, लोकसेवा हक्क कायदा, दप्तर दिरंगाई कायद्यासह इतर कायद्यांवर महत्वपूर्ण असे मार्गदर्शन केले. व सूचना दिल्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष न्यायमूर्ती श्री. वसंत शिवराम पाटील. यांनी माहिती अधिकार कायदा व न्यायालयीन प्रक्रिया याबाबत महत्वपूर्ण ज्ञानदान करून मार्गदर्शन केले. त्याबरोबरच त्यांनी सर्व कायदा प्रेमी व नागरिकांना केलेल्या सूचनेप्रमाणे या अधिवेशनात शासन प्रशासनात पारदर्शकता व उत्तरदायित्व निर्माण करून भ्रष्टाचार मुक्त सुव्यवस्था निर्माण करण्यासाठी महत्वपूर्ण विषयांवर ॲड. श्री. चंद्रकांत येशीराव यांनी ठराव मांडले व त्यास श्री. हिम्मत ठाकूर, धुळे यांनी कायदा प्रेमी तर्फे अनुमोदन देत ठराव पास करण्यात आले.
सदर अधिवेशनात साक्री येथे महाराष्ट्रातील वर्धा, नांदेड, नाशिक, जळगाव, ठाणे, मुंबई, पुणे, रायगड अशा अनेक जिल्ह्यातून निस्वार्थी कायदा प्रेमींनी उपस्थिती लावून अधिवेशनात स्वागत मूल्यासह सक्रिय सहभाग घेतला. त्याबरोबरच धुळे जिल्ह्यातील व साक्री तालुक्यातील अनेक सुजाण जागरूक नागरिकांनी, पत्रकार बांधवांनी कार्यशाळेत सहभाग नोंदविला.
सदर संमेलनाचे आयोजन कायदा प्रेमी निलेश तोरवणे, सुरेंद्र भदाणे सह महाराष्ट्रातील कायदा प्रेमींनी केले होते. तर सदरचे अधिवेशन यशस्वी पार पाडण्यासाठी मालेगाव, सटाणा, धुळे, शिरपूर , साक्री, नाशिक, चांदवड येथील कायदाप्रेमींनी विशेष सहकार्य करून आपला सहभाग नोंदविला.

कायदा प्रेमींचे राज्यस्तरीय अधिवेशनात विशेष लक्षणीय बाब म्हणजे शिरपूर तालुक्यातील बलकुवे येथील ह.भ.प. भिकन लकडू बोरसे, कीर्तनकार महाराज, (वय 75 ) यांनी स्वयंप्रेरणेने सदर अधिवेशनात सहभाग घेऊन कायद्याविषयी कार्यकर्त्यांना महत्त्वपूर्ण मार्गदर्शन व सूचना दिल्या. ते मंचावरून व्यक्त होण्याआधी त्यांच्या वयोमानावरून आणि त्यांच्या पेहराववरून त्यांना कायद्याचे एवढे ज्ञान असेल असे उपस्थितांना वाटले नव्हते.
या निस्वार्थी भ्रष्टाचार मुक्त राष्ट्र बनवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या कायदा प्रेमींच्या मेळाव्यात चांदवड तालुक्यातील गोळेचा दांपत्यचा सक्रिय सहभाग व भ्रष्टाचार मुक्त व्यवस्थेसाठी असलेली तळमळ, उठून दिसत होती. त्यामुळे श्री. गोळेचा सर व सौ जयश्री गोळेचा या निस्वार्थी कायदा प्रेमी जोडीचे सर्व उपस्थित कौतुक करत होते.
कार्यक्रमाच्या शेवटी कार्यक्रमाचे आयोजक श्री. निलेश तोरवणे व सुरेंद्र भदाणे यांनी उपस्थित मार्गदर्शक, व्याख्याते, मान्यवर कायदाप्रेमी यांचे आभार व्यक्त केले. यावेळी सर्व कायदा प्रेमींनी भ्रष्टाचार मुक्त राष्ट्र बनवण्यासाठी काम करण्याचा निर्धार करत पुढील संमेलनाचे लवकरच आयोजन करून कायद्याच्या जनजागृतीला अजून वेग देण्याच्या निर्णय उपस्थितांनी केला.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button