शेगांव येथेल शर्मा कचोरी सेंटरवर एफडीएची धाड

अधिकाऱ्यांनी तपासणीसाठी खाद्यपदार्थाचे नमुने घेतले
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
श्याम पहूरकर
शेगाव शहरातील सुप्रसिध्द मे. तिरथराम करमचंद शर्मा यांच्या कचोरी सेंटरवर काल रोजी सांयकाळी बुलढाणा एफडीएच्या पथकाने छापा टाकता असून कचोरी निर्मितीसाठी वापरण्यात येणाऱ्या कच्च्या मालाचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतले आहेत.
अन्न व औषण प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर राज्यभर भेसळयुक्त अन्नपदार्थांविरोधात धडक मोहीम सुरु केली असून, या कारवाईची झळ आता शहरातील
कचोरीसाठी लागणाऱ्या साहित्याची तपासणी
मायोरी तयार बन्नण्यासाठी वापरले जाणारे पीठ, मताले, तेल तत्तेय इतर कच्च्या मालाचे नमुने घेवल ते प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले. शेगावची कचोरी ही राज्यासह देशभरात प्रसिध्द असून, दरवर्षी येथे दर्शनासाठी येणारे लाखो भाविक क्योरीचा आस्वाद घेतात. त्यमुळे या खाद्यपदार्थाच्या गुणवत्तेबाबत प्रशासन विशेष सतर्क असलयाचे सुत्रांनी सांगितले
शेगाव प्रसिध्द कचोरी सेंटरलाही बसली आहे. बुलढाणा अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने शेगाव येथील मे.टी.आर. शर्मा कचोरी सेंटरवर छापा टाकून कचोरी निर्मितीसाठी वापरण्यात येणाऱ्या कच्च्या मालाचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतले आहेत.
अन्न व औषध प्रशासनाकडून राज्यभर खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेची तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. त्याचा एक भाग म्हणून अन्न सुरक्षा अधिकारी गुलाबसिंग वसावे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने संबंधित कचोरी सेंटरवर अचानक धाड टाकली.
राज्यात सुरू असलेल्या या मोहिमेमुळे खाद्य व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली असून, ग्राहकांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्यांवर प्रशासनाची करडी नजर असल्याचा इशारा या कारवाईतून देण्यात आला आहे.



