महाराष्ट्र

पोलीस स्थापना दिनानिमित्त मोबाईल शाप की वरदान निबंध स्पर्धा


पोलीस स्थापना दिनानिमित्त मोबाईल शाप की वरदान व रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या अनुषंगाने वाहतुकीचे नियम या विषयांवर राहुरी तालुक्यात घेतलेल्या निबंध स्पर्धेतील विजेत्यांची घोषणा*

राहुरी पोलीस स्टेशन मार्फत पोलीस स्थापना दिनाच्या निमित्ताने मोबाईल शाप की वरदान व रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या अनुषंगाने वाहतुकीचे नियम या विषयांवर निबंध स्पर्धा घेण्यात आलेल्या होत्या.
तालुक्यातील सुमारे 350 शाळांमध्ये गटविकास अधिकारी श्री मुंडे, शिक्षणाधिकारी श्री तुंबारे नगरपरिषद मुख्याधिकारी श्री ज्ञानेश्वर ठोंबरे यांच्या समन्वयातून सुमारे 10308 विद्यार्थ्यांची
वाहतुकीचे नियम या विषयावर निबंध स्पर्धा घेतली होती.

सदर स्पर्धेत इयत्ता 5 वी ते 7 वी मध्ये प्रथम तीन व उत्तेजनार्थ एक अशा एकूण प्रथम चार विद्यार्थ्यांची नावे पुढील प्रमाणे 1)गजेंद्र कैलास भाटी (प्रथम क्रमांक), आरोही इंग्लिश मेडीयम शाळा म्हैसगाव
2)श्रावणी अनिल हिवाळे, (द्वितीय क्रमांक),जिल्हा परिषद शाळा कोंढवड
3)राजवर्धिनी विजय गाडे, (तृतीय क्रमांक), भगीरतीबाई कन्या विद्यालय राहुरी
4)गौरी प्रदीप हरिश्चन्द्रे, उ्तेजनार्थ, शाहू विद्यालय खडांबे

तसेच इयत्ता 8वी ते 10 वी मध्ये 1)भूमी अशोक खिलारी, (प्रथम क्रमांक), सावित्रीबाई फुले कन्या विद्यालय
2)श्रुती सुधाकर म्हसे, (द्वितीय क्रमांक), भागीरथीबाई कन्या विद्यालय राहुरी
3)नियती दिपक ढगे, (तृतीय क्रमांक) मुळा व्हॅली पब्लिक स्कूल अग्रेवाडी
4) सिद्धी कैलास जाधव,उत्तजनार्थ, नारायणगिरी महाराज विद्यालय मल्हारवाडी

यांची निवड झाली असून विजयी विद्यार्थ्यांचा गौरव प्रजासत्ताक दिनाचे दिवशी केला जाणार आहे.

सदर स्पर्धा पैकी वाहतूक नियम या विषयावरील स्पर्धा रस्ता सुरक्षा सप्ताह चे औचित्य साधून माननीय पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक श्री वैभव कलुबर्मे साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री बसवराज शिवपुजे यांच्या मार्गदर्शनात राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वात गटविकास अधिकारी श्री मुंडे साहेब व गटशिक्षणाधिकारी श्री तुंबारे साहेब मुख्याधिकारी श्री ज्ञानेश्वर ठोंबरे यांच्या समन्वयातून घेण्यात आल्या. स्पर्धेत तालुक्यात प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव मा. तहसीलदार श्री नामदेवराव पाटील साहेब यांच्या हस्ते दिनांक 26 1 2025 रोजी राहुरी येथे करण्यात येणार आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button