बुलढाणामुक्ताईनगरसांस्कृतिक

संत डामरे महाराज समाधी मंदिर तेल्हारा येथे संत गजानन महाराज यांचा प्रगट दीन आनंदात साजरा..

संत डामरे महाराज समाधी मंदिर तेल्हारा येथे संत गजानन महाराज यांचा प्रगट दीन आनंदात साजरा..

तेल्हारा शहरामध्ये संत डामरे महाराज समाधी मंदिर येथे श्री संत गजानन महाराज यांचा प्रगट दीन महोत्सव अतिशय भक्तिमय वातावरणात, सांप्रदाईक पद्धतीने ,आनंदाने साजरा करण्यात आला.

आज दि.13/02/2023 सोमवार रोजी शेगावनिवाशी श्री संत गजानन महाराज यांचा प्रगटदीन हा दिवस  मोठ्या  आनंदाने, भक्तिभावाने सर्वत्र साजरा करण्यात येतो,तेल्हारा येथील संत डामरे महाराज समाधी मंदिर स्थित संत गजानन महाराजांचे मंदिर असून आजच्या दिनी अतिशय  सांप्रदाईक पद्धतीने टाळ मृदंगाच्या गजरात श्रीं ची प्रतिमा स्थापित पालखी काढण्यात येते ,हे मंदिर संत डामरे महाराज यांच्या हयातीतले आहे, येथे प्रत्येक  महिण्याच्या 16 तारखेला महाप्रसादाचे आयोजन भाविकं स्वखर्चाने  करत असतात, तेल्हारा शहरामधुन ज्या मार्गाने पालखी जाते त्या मार्गावरील त्या त्या भागातील महिला भगिनींनी आपल्या अंगणात सळा शिंपून खुप सुंदर-सुरेख अशा चमकि,पुष्पांच्या पाकळ्या टाकलेल्या रांगोळ्या काढललेल्या होत्या. पालखी मार्गस्थ असतांना अनेक भागातील भाविकांची श्रींचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने गर्दी झाली होती, संत डामरे महाराज समाधी नंतर त्यांचा परिवार ईतर परिवारांसहित भजन तसेच ईतर धार्मिक कार्यक्रम साजरे करत असतात.आजच्याच दिवशी श्री ब्रम्हांड नायक संत गजानन महाराज शेगाव जि.बुलढाणा येथे प्रगट झाले होते, आज श्रीं चा 145 वा प्रगट दीन, हा दिन महोत्सव म्हणून अतिशय भक्तिभावाने भाविकांनी साजरा केला .हा महोत्सव सोहळा साजरा करण्या करीता अनेकांनी अथक परिश्रम घेतले.

 विजय घोडे
तेल्हारा तालुका प्रतिनिधी 

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button