बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

सिंनगाव जहागीर शिवारात मध्यरात्री धाड; अवैध रेती वाहतूक करणारे दोन टिप्पर जप्त

तहसीलदार वैशाली डोंगरजाळ यांच्या नेतृत्वाखाली महसूलची धडक कारवाई; वाळूमाफियांमध्ये खळबळ

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी शंकर शिवरकर

देऊळगाव राजा:तालुक्यात अवैध रेती उत्खनन आणि वाहतुकीविरोधात महसूल विभागाने कारवाईचा धडाका तीव्र केला आहे. तहसीलदार वैशाली डोंगरजाळ यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सोमवार, १० ऑगस्ट रोजी मध्यरात्री २:३० वाजेच्या सुमारास मौजे सिंनगाव जहागीर शिवारात गुप्त माहितीच्या आधारे मोठी धाड टाकली. या कारवाईत अवैधरीत्या रेती वाहून नेणारे दोन मोठे टिप्पर रंगेहात पकडण्यात आले.

एका टिप्परचा नंबर खोडलेला; पोलीस ठाण्यात वाहने जप्त

महसूल विभागाने घटनास्थळी केलेल्या पंचनाम्यात धक्कादायक बाब समोर आली आहे. पकडण्यात आलेल्या वाहनांपैकी एका टिप्परचा क्रमांक MH-21-BH-9001 असा आहे, तर दुसऱ्या टिप्परवरील नंबर प्लेट आणि इतर ठिकाणचे नंबर जाणीवपूर्वक खोडलेले आढळून आले. ही दोन्ही वाहने पुढील कडक दंडात्मक आणि कायदेशीर कारवाईसाठी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली आहेत.

रात्रीच्या गस्तीत महसूल पथकाची कामगिरी

या धाडसी कारवाईत तहसीलदार डोंगरजाळ यांच्यासोबत ग्राम महसूल अधिकारी आकाश खरात, परमेश्वर बुरकुल, बबन काकड आणि विठ्ठल हरणे यांनी थेट सहभाग घेतला. महसूल विभागाच्या या मध्यरात्रीच्या धडक कारवाईमुळे तालुक्यातील अवैध रेती वाहतूक करणाऱ्या माफियांचे धाबे दणाणले आहेत.

कठोर कारवाईचा इशारा

तालुक्यात अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीला पूर्णपणे आळा घालण्यासाठी प्रशासन आता अ‍ॅक्शन मोडवर आले आहे. रात्रीच्या वेळी चोरट्या मार्गाने होणाऱ्या वाहतुकीवर महसूलचे विशेष लक्ष असून, यापुढेही नियम मोडणाऱ्यांवर अशीच कठोर आणि दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशारा तहसीलदार वैशाली डोंगरजाळ यांनी दिला आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button