Uncategorizedबुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

विरोधी पक्षाच्या नगरसेवकांच्या आक्रमक भूमिकेला यश; काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षाच्या नगरसेवकांच्या दबावानंतर चिखलीमध्ये आजपासून पाणीपुरवठा पूर्ववत

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
चिखली…. प्रतिनिधी

चिखली : गेल्या अनेक दिवसांपासून पाणीटंचाईने त्रस्त झालेल्या चिखलीकरांच्या प्रश्नावर विरोधी पक्षाने घेतलेल्या आक्रमक भूमिकेला अखेर यश आले असून प्रशासनाने तातडीने हालचाली करत आजपासून शहरातील पाणीपुरवठा पूर्ववत सुरू केला आहे.

शहरात १५ ते २० दिवसांनी होणारा पाणीपुरवठा, नागरिकांची वाढती गैरसोय आणि प्रशासनाचा ढिसाळ कारभार यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून ठोस उपाययोजना होत नसल्याने काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षाच्या नगरसेवकांनी आणि पदाधिकाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत नगरपरिषद प्रशासनाला थेट इशारा दिला होता.

त्यानंतर काल झालेल्या सर्वसाधारण सभेत विरोधी पक्षाने पाणीटंचाईच्या मुद्द्यावर प्रशासनाला चांगलेच धारेवर धरत जाब विचारला. शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत होण्यास जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. “चिखलीकरांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत असताना प्रशासन मात्र झोपेचे सोंग घेत आहे,” असा आरोप करत विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी जोरदार हल्लाबोल केला.

याच पार्श्वभूमीवर आज पहाटे डॉ. इसरार, डॉ. प्रकाश शिंगणे, डॉ. अमोल लहाने, श्री. गोकुळ शिंगणे, श्री. गोपाल देव्हडे, श्री. रत्नदीप शिनगारे, श्री. उबेद अली खान, श्री. आनंद बोन्द्रे, श्री. प्रशांत भटकर, श्री. संतोष देशमुख व श्री. पी. एस. वायाळ यांनी थेट चिखली नगरपरिषदेच्या पाणी शुद्धीकरण केंद्रावर धडक देत प्रत्यक्ष पाहणी केली.

यावेळी पाणी शुद्धीकरण केंद्रातील संपूर्ण यंत्रणा, जलसाठा, वितरण व्यवस्था तसेच शहरातील विविध भागातील पाणी✍️

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button