जळगावा जिल्हाजळगावा जिल्हामहाराष्ट्रराजकीयसंपादकीय
येथे आमदार बदलून मिळेल !

महाराष्ट्रातील सरकार पांच वर्षात तीन वेळा बदलले. इकडचे आमदार तिकडे गेले.काहींनी पक्ष सोडला.काहींनी लाज सोडली.लोकांना खूप चीड आली.खूप वाईट वाईट टिका केली.वाईट वाईट शब्द वापरले.काही लोक इतके निराश,हताष झाले कि म्हणे आता मतदान करूच नये.कळतच नाही,कोण खरे कोण खोटे?
हे नैराश्य आपल्याच मतातून निर्माण झाले आहे.आमदार तर आपल्याच जिल्ह्यातील, तालुक्यातील असतो.कोणी तर आपल्याच गावातील असतो.कोणी तर आपलाच नातेवाईक असतो.कोणी तर आपलाच पुतण्या किंवा जावई असतो.तरीही तुम्ही ओळखत नाहीत.असे कसे शक्य आहे?जर जवळचा माणूसच ओळखला नाही तर तुम्ही मतदान करण्याच्या लायकीचे नाहीत.मुलीसाठी चांगला जावई ओळखतो.अगदी नवीन ओळख निघाली तरी सुद्धा.मुलासाठी चांगली सून ओळखतो.कधी तोंड पाहिले नाही तरी सुद्धा.मग येथे आपण आमदाराचा उमेदवार ओळखू शकत नाही का?हे खोटे आहे.हे चुकीचे आहे.मी म्हणतो,आपण आमदाराचा उमेदवार ओळखतो.जळगांव शहरातील असा कोण माणूस किंवा बाई आहे कि,त्याला आमदार कोण आहे,कसा आहे,काय धंदे करतो?त्यांचा धंदा सामाजिक आहे कि असामाजिक?त्यांचा धंदा नैतिक आहे कि अनैतिक?त्यांचा धंदा माणूस घडवतो कि माणूस बिघडवतो?तो किती बुद्धीमान आहे?तो किती ज्ञानी आहे?तो किती कायदा जाणतो?तो विधानसभेत किती मुद्दे मांडतो?हे तर जळगाव शहरातील प्रत्येक माणूस व बाईला माहिती आहे.तरीही तुम्ही मतदान केले असेल तर हा तुमचा घोळ आहे.शहरातील प्रभात चौकात आमदाराचे दारूचे दुकान आहे.तेथे माणसे दारू पितात.तेथेच लघवी संडास करतात.तेथेच नागडे उघडे पडून राहातात.तर तेथे राहाणाऱ्या कौटुंबिक महिलांना चीड येते.मी विचारले ,तरीही तुम्ही विधानसभेत कोणाला मतदान केले.म्हणे ,याच दारू दुकानदाराला. ही त्या महिला मतदारांची चुक नाही का?तेथील पुरूष मतदारांची चूक नाही का? मी विचारले ,का?म्हणे मोदीकडे पाहून.विचार करा ,जर मोदी जर इतके पवित्र माणूस आहेत तर त्यांचा आमदार दारू विक्रेता कसा? म्हणजे मोदी सुद्धा आमच्या आमदाराच्या विचारांचे, प्रवृत्तीचे असावेत.
हे मोदी महाशय,राम मंदिर बांधत आहेत.त्याचे श्रेय घेऊन हिंदूंची मते मिळवत आहेत.तर हेच राम अयोध्या सोडून,राजपाट त्यागून दंडकारण्यात पंचवटीला आले.घर नाही.धन दागिने नाही.नोकर चाकर नाही.तर मग,रामाने दारूचा धंदा सुरू केला होता का?जसा मोदींच्या मित्राने केला.जी नैतिकता रामाने पाळली तशीच नैतिकता मोदींनी किंवा त्यांच्या मित्राने पाळली का?नाही!तर मग, तुम्ही महिला आणि पुरूष मतदारांनी दारू विकणाऱ्या माणसाला मतदान का केले?येथे तुम्ही मतदार सुद्धा अविचारी वागले.अनैतिक वागले.त्याचा हा परिणाम आहे.दारू पिऊन तर्रर्र झालेली नागडी उघडी माणसे तुमच्या अंगणात, ओट्यावर झोपतीलच.झोपू द्या.त्यांची सेवा करा.त्यामुळे तुम्ही चुकीच्या माणसाला मतदान केल्याचे पाप तरी फिटेल.
लोकशाहीत आमदार खासदार, नगरसेवक,झेडप्या निवडण्याची चांगली व्यवस्था केली आहे.एक,तो उमेदवार स्थानिक मतदार यादीत असावा.दोन,त्याला तुम्ही एकवीस वर्षांपासून ओळखत असावेत.तीन,नसतील ओळखत तरीही मतदान करण्यापुर्वी तो दहा दिवस ओळख देत फिरतो.त्याची माहिती निवडणूक अधिकारी घेतात.बैनर लावून जाहिर करतात.तरीही तुम्ही दारूवाला, रेतीमाफिया, डान्सबारवाला,सट्टावाला,चाकू सुरी पिस्तूल वाला माणसाला मतदान करीत असाल तर तुमचा हेतू काय? हो!तुमचा हेतू असतो फक्त पैसा.तुमचे लक्ष त्या पैशाकडे असते.तमचे लक्ष दारू,मटण,जेवण कडे असते.आणि जो हे पुरवतो त्यालाच तुम्ही मत देऊन मोकळे होतात.कर रे भाऊ धिंगाणा! कर नंगा नाच !उचल पोरी.आणि कर लगीन.असाच धिंगाणा आणि नंगानाच महाराष्ट्र विधानसभेत चालू आहे.आणि तुम्ही विचारतात.काय हो शिवराम पाटील काका!हे काय चालले आहे?मी म्हणतो,हे तुमच्या चुकीचे फळ आहे.हे तुमच्या लोभाचे फळ आहे.
शिंदे, गुलाबराव गिरोह ने शिवसेना सोडली.आणि पळाले आसामच्या जंगलात.जसे गुन्हेगार पळतात आणि पोलिस मागावर असतात.लोकांना राग आला.आला ना! तर मग,हा काढण्याची तुम्हाला संधी आहे.दर पांच वर्षांनी.आता तर फक्त एकदिड वर्षांनी किंवा आधी सुद्धा.ही संधी राग आलेल्या लोकांनी घेतली पाहिजे.हे काम कोण करील?राम, कृष्ण,येशू ,अल्ला करतील का?त्यांनी तुम्हाला मेंदू दिला.बुद्धी टाकली.हृदय दिले.काळीज दिले.तुम्ही वापरत नसाल तर आकाशातील देव तरी काय करणार?
आता अजितदादा आणि गिरोह ने काकांना सोडले.जन्मादात्या बापापेक्षा जास्त सांभाळले.मोठे केले.निवडून आणले.मंत्री बनवले.चार पांच साखर कारखाने घेऊन दिले.आणखी काय काय दिले ते काका आणि पुतण्या सांगतीलच.तरीही पुतण्याने असे करावे का? म्हणे,हे भाजप वाले मला इडी लावून बेडी घालून जेलमधे टाकणार होते.भुजबळ, देशमुख,नबाब सारखे.हे काय उत्तर झाले?जर जेलमधे जाण्याची इतकी भीती वाटली होती तर चोरी करतातच कशाला?जे मानधन आमदाराला मिळते त्यात घरखर्च,किराणा,कपडे,शाळा, दवाखाना भागत नाही का? आम्ही भागवतोच भाजीपाला विकून.ट्युशन घेऊन.सायकलचा पंचर काढून.रिक्षा चालवून.पण नाही! ही माणसे चोरी करतात.यांना चोरीची सवय जडलेली आहे.लखोपती ,करोडपती ,अब्जोपती झाले तरीही चोरी करणारच.
मतदारांनो,आता तर कळले ना! आपला आमदार नालायक आहे.आपला आमदार चोर आहे.आपला आमदार विश्वासघात करतो.जर नको असेल तर ,आता बदलून टाका.आतापासून विचार करा.आतापासून प्रयत्न करा .कि, आम्हाला आमदार बदलून पाहिजे.आणि हे बदलणे खूप सोपे आहे.मतदानातून.
मतदारांनो, आमदार जर नालायक निघाला.बदमाष निघाला.चोर निघाला.तर त्याच्या पापाचे पाढे वाचणे सुरू करा.दहा बारा लोक एकत्र या.टिम बनवा.मिशन काढा.आपल्या मतदारसंघात गावोगावी फिरा.मतदारांना सांगून समजवा.आता हा आमदार बदलणे आहे.याला मतदान करू नका.आपल्या मतदारसंघात पांच लाख लोकांमधे अनेक माणसे चांगली आहेत.त्यातून चांगला माणूस आमदार निवडून देऊ.
आम्ही जळगाव जागृत जनमंच ने ही मोहीम सुरू केली आहे.ज्या लोकांना आकलन झाले,ज्याला हिंमत आहे,ज्याला बदल हवा आहे, ती माणसे आमच्या सोबत येत आहेत.ज्यांची घोंगडी आमदाराच्या पायाखाली अडकली आहे,ज्याचा कटोरा आमदाराच्या हाताखाली धरून आहेत,ते अजून आमच्या मिशन मधे आले नाहीत.
काही माणसे आम्हाला विचारतात, तुम्ही मतदारांना काय देणार? आम्ही म्हणतो,जे काम आज करीत आहोत,त्याचे फळ मतदारांना मिळणार.तेच तर हवे आहे.रस्ता,पाणी,गटार,वीज,सफाई,शाळा वगैरे वगैरे.आणि हे कोठून देणार?ते तुम्ही दिलेल्या करातूनच.कोणताही आमदार स्वताचे घर,बंगला, दुकान,शेत, गाडी, दागिने विकून मतदारांना पैसे देत नाही.तो देतो,त्याने केलेल्या चोरीतूनच.त्याला तुम्ही मत विकतात.निवडून देतात.परवाना देतात, पुन्हा चोरीचा,लुटमारीचा.तो लुटतो कोठून?तुमच्याच ताटातून.म्हणजे,तुमचाच गहू आणि तुम्हाला जेवू.
विधानसभा निवडणुकीला आता दिड वर्षे बाकी आहेत.सभ्य,सुज्ञ, जागृत लोकांनी आतापासूनच टिम बनवून मिशन काढले तर नक्कीच आमदार बदलून मिळेल.आमदार बदलणे ही काळाजी गरज आहे.लोकशाहीची गरज आहे.आजची तर नितांत गरज आहे.
… शिवराम पाटील
महाराष्ट्र जागृत जनमंच
जळगाव.



