२००२ च्या मतदार यादीत नाव असेल तरच पुढील नवीन मतदार यादीत नाव येईल अन्यथा नवीन मतदार यादीतून नाव वगळणार.

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस,
प्रतिनिधी , रतन भगत. (पुणे )दि.१२/३/२०२६. सविस्तर वृत्त असे की, केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रासह २२ राज्यांमध्ये मतदार याद्यांच्या विशेष सदन पुन्हा निरीक्षण कार्यक्रमास मान्यता दिली आहे. राज्यातील २०२५ मधील मतदार याद्यांची पडताळणी २००२ च्या मतदार यादी सी करण्यात येणार आहे. २००२ च्या मतदार यादीत नाव नसल्यास मतदाराला आई-वडिलांचे आजोबांचे नाव मतदार यादीत असल्याचे सिद्ध करावे लागेल किंवा कसा पुरावा लागेल. अन्यथा अशा मतदारांची नावे नवीन मतदार यादी मधून वगळण्यात येणार आहेत. राज्यभरात हे काम यापूर्वी सुरू करण्यात आले असून मतदारसंघाचे हद्द निश्चित करण्यात आली आहे. दोन्ही याद्यांमध्ये असलेल्या मतदारांच्या नावाची जोडणी अर्थात मॅपिंग करण्यात येत आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रात मतदार याद्यांचे विशेष सदन पुनर्नरीक्षण ( एस आय आर) करण्याचे निर्देश दिले आहेत. हे पुनः निरीक्षण माहे एप्रिलमध्ये सुरू करण्यात येणार असून आठ ते नऊ महिन्यापासून सुरू केलेले आहे २००२ मधील मतदार संघाच्या हद्दीची २०२५ मधील जुळवणी अर्थात हद्द निश्चित करण्यात येत आहे. दोन्ही मतदार याद्यात नाव असलेल्या मतदारांची शोध मोहीम सुरू असून अशांना चिन्हांकित करण्यात येत आहे प्रत्येक बी एल ओ कडे असे १४०० मतदार देण्यात आलेले आहेत .हे मतदार अंतिम असल्याचे गृहीत धरण्यात येतील.
या संपूर्ण प्रक्रियेसाठी सुमारे ८० दिवसांचा कालावधी देण्यात येणार आहे. यात ३० दिवस सुनावणीसाठी असतील ज्या जिल्ह्यात मतदार संघाची फेररचना जास्त प्रमाणात झाली अशा ठिकाणी ही प्रक्रिया जोखमीची असेल .यात मुंबई पुणे ठाणे अशा जिल्ह्यांचा समावेश आहे. मतदारांनी स्वतःचे २००२ मधील यादीत नाव शोधून पुरावा दिल्यास बी एल ओ चे काम सोपे होणार आहे. जे मतदार प्रत्यक्ष जागेवर आढळणार नाहीत अशांची नावे वगळण्यात येतील ,अशांना आपले नाव नवीन मतदार यादी मध्ये समाविष्ट होण्यासाठी कागदपत्र जमावे करण्या लागणार आहे. या कागदपत्रांची ही पुन्हा पडताळणी केली जाणार आहे. अशी माहिती संबंधित सूत्रांकडून मिळालेली आहे.



