Uncategorized

पिक विमा नाकारण्यात आलेल्या व लाभ प्रलंबित असलेल्या शेतकऱ्यांना मिळणार फळ पिक विम्याचा लाभ – खासदार श्रीमती रक्षाताई खडसे

पुनर्रचित हवामानावर आधारित “फळ पिक विमा योजना आंबिया बहार” सन २०२२ मध्ये एकूण ७८००० शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचा विमा उतरविलेला होता, त्यातील प्रलंबित असलेल्या ५४००० शेतकऱ्यांना थेट बँक खात्यात पिक विम्याच्या नुकसान भरपाईचा लाभ मिळणार होता, त्यातील ४५००० शेतकऱ्यांना लाभ मिळाला असून, अनेक शेतकऱ्यांना टप्याटप्याने लाभ मिळणार होता राहिलेल्या ९००० शेतकऱ्यांना एकूण रु.३०,७२,७२,५७७/ रक्कम वितरीत करण्यात आलेली असून, त्याबाबत शासनाचा जीआर निघाला आहे. तसेच पिक विम्याचा लाभ नाकारण्यात आलेल्या ११०२२ शेतकऱ्यापैकी ६६८६ शेतकऱ्यांना पिक विम्याचा लाभ मिळणार असल्याबाबत माहिती खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी दिली.

विमा कंपनी मार्फत ११०२२ शेतकऱ्यांना पिक विम्याचा लाभ नाकारण्यात आला होता, त्याबाबत खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी लोकसभेत प्रश्न उपस्थित करून, याबाबत जिल्हास्तरावर कमिटी स्थापन करून शेतकऱ्यांना न्याय देणे बाबत मागणी केली होती. त्यानुसार, पिक विम्याचा लाभ नाकारण्यात ११०२२ शेतकऱ्यापैकी ८१९० शेतकऱ्यांनी दाद मागून पुरावे सादर केल्यानंतर ६६८६ शेतकऱ्यांना पिक विम्याच्या प्रलंबित लाभासाठी पात्र ठरवण्यात येऊन, लवकरच लाभ मिळणार आहे. तसेच पिक विम्याचा लाभा प्रलंबित असलेल्या शेतकऱ्यांनासाठी जिल्हाधिकारी कार्यालय येथे खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या मार्फत बैठक घेण्यात येऊन शेतकऱ्यांना असलेले आक्षेप विमा कंपनी कडे पाठवून त्यांचापण प्रश्न लवकरच मार्गी लावणार असल्याबाबत यावेळी त्यांनी माहिती दिली.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button