पावसाची दीर्घ दडी! बुलढाणा जिल्हा तातडीने कोरडा दुष्काळ जाहीर करा;खामगांव येथे काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांचे आंदोलन तसेच शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्याची मागणी

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी :गजानन तांगडे खामगाव
खामगांव तालुक्यात दीड महिन्याच्या जवळपास पावसाने दडी मारल्यामुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले,असून बळीराजा पूर्ण कोलमोडला आहे. या परिस्थितीचे गांभीर्य पाहता बुलढाणा जिल्हा तातडीने कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात यावी या मागणीसाठी किसान काँग्रेस व खामगाव विधानसभा काँग्रेस कमिटीच्या वतीने खामगांव येथील एचडीओ कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. आंदोलन दरम्यान एक अतिशय सुन्न करणारा प्रसंग पायाला मिळाला उपविभागीय अधिकारी डॉ. रामेश्वर पुरी यांना निवेदन देताना शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील वाढलेल्या पिकाच्या पिंड्या या समोर ठेवल्या साहेब उसनवारी करून कर्ज काढून पेरणी केली होती… आता पोरा बाळांना काय भरवू ? हा सवाल विचारताना खंबीर असणाऱ्या बळीराजाच्या डोळ्यातून अश्रूचा बाण फुटला हवालदिल झालेल्या व शेतकऱ्याची अवस्था पाहून तिथे उपस्थित प्रत्येकाचे मन हेलावले.यावेळी हातात वाढलेल्या सोयाबीनच्या पेड्या आणि उरात संतापाचा वनवा घेऊन उतरलेल्या शेतकरी व काँग्रेस कार्यकर्त्यांनी प्रशासनाच्या अवस्थेत विरोधात आणि सरकारच्या धोरणाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
यावेळी एचडीओ डॉ रामेश्वर पुरी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना मागण्या संदर्भात निवेदन सादर करण्यात आले निवेदनात नमूद आहे की बुलढाणा जिल्ह्यात गेल्या दीड महिन्यापासून पावसाने दडी मारल्यामुळे गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसा अभावी शेतातील सोयाबीन तूर तसेच इतर सर्व पिके सुखकत असून नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत त्यामुळे शेतकरी बांधवांसमोर मोठे आर्थिक संकट निर्माण झाले आहे. पिकाचे नुकसान,वाढता उत्पादन खर्च,कर्जाचा बोजा, मुलांनाच्या शिक्षणाचा खर्च, कुटुंबाचा खर्च,आणि उत्पन्नाचे साधन नसल्यामुळे शेतकरी अत्यंत अडचणीत सापडला आहे. या प्रतिकूल परिस्थितीमुळे शेतकरी बांधवांनी आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल उचलल्याचेही निदर्शनास आले आहे. त्यामुळे शासनाने या गंभीर परिस्थितीची तातडीने दखल घेऊन बुलढाणा जिल्हा तातडीने कोरडा दुष्काळ जाहीर करावा, कर्जमाफी जाहीर झालेली असली तरी विविध निकषामुळे अनेक शेतकरी कर्जमाफी पासून वंचित राहिले आहेत त्यामुळे सर्व थकीत शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीचा लाभ द्यावा, शेतातील पिकांना आवश्यक पाणी उपलब्ध होण्यासाठी विद्युत पुरवठा दिवसभर व नियमित स्वरूपात करण्यात यावा, नादुरुस्त विद्युत डीपी, ट्रांसफार्मर विना विलंब दुरुस्त करून वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यात यावा, पावसा अभावी झालेल्या पिकाच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना योग्य ती नुकसान भरपाई व आर्थिक मदत देण्यात यावी, आधी मागण्या करण्यात आल्या आहे. यावेळी काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष तेजेन्द्र सिंह चौहान, शहराध्यक्ष स्वप्निल ठाकरे पाटील, कार्याध्यक्ष किशोर आप्पा भोसले, ओबीसी विभागाचे सचिव अजय तायडे, किसान काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रकाश इंगळे, किसान काँग्रेस कार्याध्यक्ष कैलास साबे, काँग्रेस ओबीसी सेलचे नेते कैलास फाटे, युवक काँग्रेसचे अध्यक्ष अचलेश्वर दिपके, जिल्हा संघटन सचिव अतुल शिरसाट यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते आणि शेतकरी बांधव उपस्थित होते. तसेच मा. उपविभागीय अधिकारी यांच्याकडे निवेदन देत असताना सोबत असलेले शेतकरी सुकलेले सोयाबीनचे झाड घेऊन चर्चा करायला समोर आले असता शेतकऱ्यांना अश्रू अनावर झाले. त्यामुळे सरकारने कोणतेही आढेवेढे न घेता शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी केली आहे



