महाराष्ट्रविदर्भ

पातूर येथे चिमुकल्यांनी अनुभवला दीक्षांत समारंभ

पातुर तालुका प्रतिनिधी सुखलाल उपर्वट किड्स पॅराडाईजचा अभिनव उपक्रमपातूर : येथील किड्स पॅराडाईज पब्लिक स्कूलच्या पुर्व प्राथमिकच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी खराखुरा दीक्षांत समारंभ अनुभवला. किड्स पॅराडाईज पब्लिक स्कूलच्या पुर्व प्राथमिक शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांचा दीक्षांत समारंभ नुकताच थाटात पार पडला. यावेळी या सोहळ्याचे अध्यक्ष म्हणून शाळेचे संस्थापक अध्यक्ष गोपाल गाडगे हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून कार्यकारी संचालिका सौ. ज्योत्स्ना गाडगे या उपस्थित होत्या.सर्वप्रथम पुर्व प्राथमिक शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. त्यांनतर मान्यवरांचे हस्ते या विद्यार्थ्यांना पुर्व प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्याची पदवीका बहाल करण्यात आली. यांनतर पुर्व प्राथमिक शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना प्राथमिक शाळेच्या शिक्षकांकडे सोपविण्यात आले. दीक्षांत समारंभाच्या वेळी चिमुकल्या विद्यार्थ्यांनी केलेली वेशभूषा या सोहळ्याचे आकर्षण ठरली होती.या सोहळ्याचे संचालन अश्विनी अंभोरे यांनी केले. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक चंद्रमणी धाडसे, अविनाश पाटील,नरेंद्र बोरकर, भारती निमकाळे, योगिता देवकर, नितु ढोणे, शितल कवडकार, लक्ष्मी निमकाळे, नयना हाडके, प्रियंका चव्हाण, पल्लवी पाठक, वंदना पोहरे, पल्लवी खंडारे, हरिष सौंदळे,बजरंग भुजबटराव, कल्पना इंगळे, रुपाली पोहरे आदींनी परिश्रम घेतले.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button