पाटसूल आश्रम येथे सर्वांगीणसुसंस्कार शिबिर २ मे पासून सुरु!

आदर्श नागरिक घडवण्याकरिता विद्यार्थ्यांनी शिबिराचा लाभ घ्यावा ; राष्ट्रीय कीर्तनकार शुकदास महाराज गाडेकर यांचे आवाहन!

अकोला / पाटसूल: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज,
वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा यांच्या
पदस्पर्शाने पावन झालेली भूमी श्री
गुरुदेव सेवाश्रम पाटसूल येथील आश्रमात दि. २ मे ते ३० मे २०२५ दरम्यान सुसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ३३
वर्षापासून सुरू असलेल्या शिबिरात
संपूर्ण महाराष्ट्रातून विद्यार्थ्यांचा सहभाग
असतो. या शिबीरामधे सामुदायिक ध्यान ,सामुदायिक प्रार्थना ,सामुदायिक रामधुन ,ग्रामगीता ,संत तत्वज्ञान ,सर्व धर्म समभाव ,भजन, भाषण
किर्तन ,आयुर्वेद ,सेंद्रीय शेती ,व्यसनमुक्ती ,योगासन ,
प्राणायाम ,स्वावलंबन ,लाठी-काठी , ज्युडो कराटे ,कुस्ती ,व्यक्तिमत्त्व विकास, आदि प्रकारचे प्रशिक्षण मिळते. तसेच शिबिरामध्ये विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.
शिबिरात तज्ज्ञ शिक्षक मंडळीचे
मार्गदर्शन लाभणार आहे.
शिबिर विनामूल्य राहणार असून १२ ते २५ वर्षे
वयोगटातील मुलांना शिबिरात सहभागी
होता येणार आहे. आदर्श नागरिक
घडविण्यासाठी विद्यार्थ्यांनी या
शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री
गुरुदेव सेवाश्रम पाटसूलचे संचालक, राष्ट्रीय
कीर्तनकार श्री शुकदास गाडेकर महाराज यांनी केले आहे.



