फिसच्या नावावर मागासवर्गीय विद्यार्थ्यांची कॉलेज कडून लूट,

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी : प्रशांत चव्हाण
वाशिम : (दि 18जून) शहरातील राजर्षी शाहू कॉलेज ऑफ नर्सिंग आणि मदर तेरेसा कॉलेज ऑफ नर्सिंग वाशिम या कॉलेज कडून मागासवर्गीय विद्यार्थ्यांची कॉलेज फिसच्या नावावर लूटमार सुरू असल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी, समाजकल्याण अधिकारी यांना तक्रारवजा निवेदन संबंधित कॉलेजच्या विद्यार्थ्यांकडून देण्यात आली. प्राथमिक माहिती अशी की संबंधित कॉलेज प्रशासनाला सरकारकडून मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येते ती शिष्यवृत्ती कॉलेज प्रशासन आपल्याकडे ठेऊन घेते तसेच या व्यतिरिक्त विद्यार्थ्यांकडून नियमाबाहेर वेगळी फीस आकारण्यात येते. तसेच या कॉलेज मध्ये क्लिनिकल लॅबोरेटरी, अभ्यासिका अशा प्रकारच्या कोणत्याही सुविधा उपलब्ध नाहीत. कॉलेज प्रशासन आणि मॅनेजमेंटला याची तक्रार देऊन सुद्धा कसल्याही प्रकारची करवाई न झाल्याने विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय आणि समाजकल्याण कार्यालय गाठून तक्रार केली असता कॉलेज प्रशासनाने कॉलेज बंद करण्याची धमकी दिली ,
तसेच दुसऱ्या दिवशी कॉलेज बंद ठेवण्यात आले.
कसलीही सुविधा न देता शिष्यवृत्ती आणि अतिरिक्त फिस कॉलेज प्रशासन घेत असल्याने गरीब, मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे मानसिक आणि आर्थिक नुकसान होत आहे. तसेच भविष्यात रुग्णांची सेवा करण्याची आवड म्हणून या क्षेत्रात आलेल्या विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत कॉलेज प्रशासन खेळत असल्याची भावना विद्यार्थ्यांमध्ये आहे.



