Uncategorized

महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना अकोला जिल्हाध्यक्ष प्रशंसा मनोज अंबेरे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याबाबद निवेदन ! परिसरात अनुचित प्रकार घडल्यास प्रशासन राहिल जबाबदार ; प्रशंसा अंभेरे!

विजय मनोहरराव घोडे
अकोला जिल्हा प्रतिनिधी
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

स्थानिक छत्रपती शिवाजी नगर जुने शहर अकोला या भागातील भाजी बाजारात काही ना काही कारणावरून नेहमी वाद-विवाद चालू असतात. या परिसरातच छ.शिवाजी महाराजांचे स्मारक सुध्दा आहे. या परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये व काही समाजकंटकाच्या माध्यमातूनही कोणताही अनुचित प्रकार घडु नये म्हणून या परिसरातील परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन या ठिकाणी सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसवण्याची गरज आहे. त्यामुळे या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्यात यावे अशा स्वरूपाच्या मागणीचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण महीला सेना अकोला जिल्हाध्यक्ष प्रशंसा मनोज अंभेरे यांच्याकडून जिल्हाधिकारी अकोला यांना देण्यात आले.
सी.सी.टिव्ही कॅमेरा न बसविल्यास या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडला तर त्या कारणास सर्वस्वी जबाबदार प्रशासन राहणार असल्याचे निवेदनात नमूद आहे. या ठिकाणावरून दररोज अवैध जड वाहनाची सुध्दा ये-जा चालु असते. त्यामुळे वाहतूकीची तुंबळ निर्माण होते व तेथील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे सदर भागात लहान मुलांची शाळा सुध्दा आहे , जड वाहतूकीचा लहान मुलांना व पालकांना सुध्दा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच जड वाहतूकीमुळे गर्दी होत असल्यामुळे त्याचा फायदा भुरटे चोर घेत आहे. या अवैध जड वाहतुकीमुळे एखादी जिवित हानी सुध्दा होऊ शकते.
हया दोन्ही गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेऊन लवकरात-लवकर उपाय योजना करावी अशी निवेदनाद्वारे विनंती प्रशंसा मनोज अंभोरे यांनी केली.

त्यावर अकोला जिल्हाधिकारी यांनी लवकरच या परिसरात सी.सी.टि.व्ही कॅमेरा बसवण्यात येणार व जड वाहतूक सुद्धा बंद करण्यात येणार असल्याचे  आश्वासन दिले. 

यावेळी रूपाली गमे शहर उपाध्यक्ष , संगीता चोपडे विभाग अध्यक्ष , सारिका नरडे शाखाध्यक्ष, प्रिया ठाकूर सर्कल अध्यक्ष, अनिता डिगेकर शाखा उपाध्यक्ष, संगिता मेहसरे सर्कल अध्यक्ष आदी महीला उपस्थित होत्या.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button