बुलढाणामहाराष्ट्र

पहुरपूर्णा फाट्यावरील दोन पानपट्टीतून प्रतिबंधित गुटखा जप्त

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

श्याम पहूरकर

तालुक्यातील पहुरपूर्णा फाट्यावरील पुर्णाई पान सेन्टर व महालक्ष्मी पान सेंटर येथून शेगाव ग्रामीण पोलिसांनी प्रतिबंधित गुटखा माल जप्त केला आहे.

पोलिसांनी पुर्णाई पान सेंटर या पानपट्टीवर छापा टाकून झडती घेतली असता पानपट्टीमध्ये केसरयुक्त विमल पान मसाला गुटखा १५ नग, सोबत तंबाखू पुड्या, सिगारेट पाकीट सिलबंद असा एकूण २५० रूपयांचा तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाचा मुद्देमाल आढळून आला. पोलीसांची मालाची जप्ती करून आरोपी रामकृष्ण रामराव खेट्टे रा. मनसगाव याचे विरूध्द कलम ६(इ), २४ सिगारेट आणि इतर तंबाखु उत्पादने अधिनीयम २००३ अन्वये गुन्हा दाखल केला असून घटनेचा पुढील तपास पोहेको धनराज माने हे करित आहेत.

तसेच महालक्ष्मी पान सेंटरवर छापा
टाकून झडती घेतली असता पानपट्टीमध्ये केसरयुक्त विमल पानमसाला गुटखा ११ नग सोबत व्ही १ तंबाखू पुड्या,10
सिगारेट पाकिट सिलबंद असा एकूण २१० रूपयांचा तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाचा मुद्देमाल आढळून आला. पोलीसांची मालाची जप्ती करून आरोपी चंद्रभान शिवहरी रोहनकार वय ५५ वर्षे रा. पहरपुर्णा यांचे विरूध्द कलम ६(इ), २४ सिगारेट आणि इतर तंबाखु उत्पादने अधिनीयम २००३ अन्वये गुन्हा दाखल केला असून घटनेचा पुढील तपास पोहेकों धनराज माने हे करित आहेत.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button