जळगावजळगावा जिल्हामहाराष्ट्रमुक्ताईनगर

सावदा पोलीस निरीक्षकांविरुद्ध हक्कभंग; आमदार एकनाथराव खडसेंची सूचना सभापतींनी स्वीकारली

जळगाव जिल्ह्यातील सावदा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांनी लोकप्रतिनिधींशी उद्धट वर्तन केल्याप्रकरण आता विधान परिषदेत गाजणार आहे. आमदार एकनाथराव खडसे यांनी मांडलेली विशेषाधिकार भंगाची सूचना सभापतींनी स्वीकारली असून, या प्रकरणाची आता लवकरच अधिकृत चौकशी होणार आहे. रावेर तालुक्यातील तासखेडा शिवारात हतनूर कालव्याच्या मातीची अवैध चोरी झाल्याचा प्रश्न आमदार खडसे यांनी तारांकित प्रश्नाद्वारे सभागृहात उपस्थित केला होता. या प्रकरणी ४५६५ ब्रास मातीची चोरी झाल्याचे शासनाने मान्य करूनही, पोलिसांनी कोणतीही ठोस कारवाई केली नव्हती.

या प्रकरणाचा पाठपुरावा करण्यासाठी आमदार खडसे ११ फेब्रुवारी २०२६ रोजी सावदा पोलीस स्टेशनला गेले असता, सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांनी त्यांना अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप पत्रात करण्यात आला आहे. “तपास सुरू आहे, तुमचा हस्तक्षेप नको” असे मोठ्या आवाजात ओरडून सांगत, लोकप्रतिनिधींना सन्मानाची वागणूक देण्याच्या शासन निर्णयाचे उल्लंघन केल्याचे खडसे यांनी म्हटले आहे. इतकेच नव्हे तर, खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन आपल्या दीर्घ राजकीय कारकिर्दीतील सामाजिक व राजकीय प्रतिष्ठा मलीन करण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सभापतींनी ही सूचना मान्य केली असून, हे प्रकरण आता विधान परिषद विशेषाधिकार समितीकडे चौकशीसाठी सोपवण्यात येणार आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button