बुलढाणामहाराष्ट्र

*श्री संत गजानन महाराज मंदिर परिसरातील नो पार्किंग झोन यशस्वी*

*श्री संत गजानन महाराज मंदिर परिसरातील नो पार्किंग झोन यशस्वी* *शेगाव(प्रतिनिधी)* जिल्हाधिकाऱ्यांनी नो पार्किंग झोन घोषित केल्यानंतर शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांच्या नियोजनामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक पासून श्री संत गजानन महाराज मंदिर गेटपर्यंतचा मार्ग मोकळा झालेला दिसत आहे. महाराष्ट्रातील प्रमुख तीर्थक्षेत्र असलेल्या संत नगरी शेगाव शहरात केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे तर भारताच्या विविध प्रांतातून दररोज शेकडोच्या संख्येने भाविक श्री संत गजानन महाराज यांच्या समाधी मंदिरात दर्शनासाठी येत असतात शेगाव येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकापासून श्री संत गजानन महाराज मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर व्यवसायिक तसेच वाहन चालक हे रस्त्याच्या मधोमधच वाहने उभी करत असल्याने याचप्रमाणे अनेकांनी रस्त्याच्या मधोमध दुकाने टाकल्याने हा रस्ता व भाविकांसाठी येण्या जाण्यासाठी फारच अडचणीचा झालेला होता सध्या सणासुदीचे दिवस असून त्यामुळे श्रींच्या मंदिरात येणाऱ्या भाविकांची गर्दी वाढलेली आहे सदर बाब लक्षात घेऊन बुलढाणा येथील जिल्हाधिकारी यांनी शेगाव शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकापासून श्री संत गजानन महाराज मंदिराच्या गेटपर्यंत चा भाग हा नऊ पार्किंग झोन म्हणून घोषित केला शेगाव शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार अनिल गोपाळ यांनी या संपूर्ण भागामध्ये पोलिसांचा चूक बंदोबस्त लावून रस्त्यावर झालेली अतिक्रमण आठवले व रस्त्याच्या मधोमध वाहन उभी करणाऱ्यांना तंबी दिल्यामुळे हा संपूर्ण रस्ता मोकळा झालेला आहे त्यामुळे भाविक समाधान व्यक्त करताना दिसत आहेत.( स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी शेगाव मिलिंद )

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button