Uncategorized

भुसावळच्या डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूलचा १०० टक्के निकाल

भुसावळ – सीबीएससी बोर्ड मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडिअम स्कूलचा निकाल १०० टक्के लागला असून दहावीत प्रथम नमामि लक्ष्मण प्रजापती ९५ टक्के तसेच एसएसटी विषयात १०० पैकी १०० गुण प्राप्त केले. शुभीका स्वर्णकार ९४ टक्के, हितेन सुरंगे ९३ टक्के ,हमीद आसिफ इक्बाल शेख ९२ टक्के अशितोष सुरेश चावराई ९१.४० टक्के गुण प्राप्त केले. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, डॉ. केतकी पाटील डॉ. वैभव पाटील व मुख्याध्यापिका अनघा पाटील यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
बारावीच्या निकालातही विद्यार्थी चमकले
भुसावळ येथील डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूलच्या बारावीच्या निकालातही विद्यार्थ्यांनी नेत्रदिपक कामगिरी करीत यश संपादन केले. बारावीचा निकाल देखिल १०० टक्के लागला आहे. यात सत्यम कटियार ९२.२० टक्के , अभिजीत आनंद ९१.२० टक्के, सार्थक निगम ८९.६० टक्के, निधी दीपक जावळे, ८७.२०टक्के आशितोष कुमार, देवनगन ८६.६० टक्के गुण प्राप्त केले. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, डॉ. केतकी पाटील डॉ. वैभव पाटील व मुख्याध्यापिका अनघा पाटील यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button