मुक्ताईनगर येथे ‘राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार’ पक्षाची महत्त्वाची बैठक; संघटनात्मक बांधणी आणि आगामी निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ‘राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार’ पक्षाने आपली कंबर कसली असून, पक्ष संघटन अधिक मजबूत करण्यासाठी काल खडसे फार्म, मुक्ताईनगर येथे एका महत्त्वपूर्ण संघटनात्मक बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत मतदार यादी नियोजन आणि प्रत्येक बूथ स्तरावर BLO (बी.एल.ओ.) नेमणुकीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
या बैठकीस मार्गदर्शक म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री माननीय आमदार एकनाथराव खडसे साहेब उपस्थित होते. त्यांच्यासोबतच जिल्हा निरीक्षक मा. भास्करराव काळेसाहेब, जिल्हाध्यक्ष मा. प्रमोद नाना पाटील आणि जिल्हा उपाध्यक्ष श्री. यू. डी. पाटील सर यांची प्रमुख उपस्थिती होती.
बैठकीच्या सुरुवातीला आगामी निवडणुकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या ‘मतदार यादी एस.आय.आर. (SIR) मॅपिंग’ या विषयावर सादरीकरण करण्यात आले. निवडणूक काळात प्रत्येक बूथवर सूक्ष्म नियोजन करण्यासाठी आणि मतदारांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी सक्षम BLO (बी.एल.ओ.) नेमणुकीवर विशेष भर देण्यात आला. तसेच, पक्ष संघटना अधिक गतिमान करण्यासाठी विविध स्तरावर नियुक्त करण्यात आलेल्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे यावेळी अभिनंदन करण्यात आले व त्यांना त्यांच्या नवीन जबाबदाऱ्यांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
या बैठकीला तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची मोठी उपस्थिती होती. यामध्ये बोदवड तालुकाध्यक्ष श्री. प्रशांत (आबा) पाटील, मुक्ताईनगर तालुकाध्यक्ष श्री. रामभाऊ पाटील, माजी सभापती श्री. निवृत्तीभाऊ पाटील, श्री. भाऊराव पाटील सर, माजी जि.प. सदस्य श्री. रामदास भाऊ पाटील, श्री. विलासभाऊ देवकर, संचालक (कृ.उ.बा. समिती, बोदवड) डॉ. ए. एन. काजळे, शहराध्यक्ष श्री. राजुभाऊ माळी, तालुका उपाध्यक्ष श्री. विकास पाटील, सरपंच डॉ. बी. सी. महाजन, माजी सभापती श्री. विलास भाऊ धायडे यांचा समावेश होता.
तसेच श्री. प्रवीण कांडेलकर, श्री. सुनील पाटील, श्री. भागवत महाजन, श्री. माणिकराव पाटील, श्री. पुरुषोत्तम पाटील, श्री. रवींद्र दांडगे, श्री. सुनील काटे, श्री. संदीप डिवरे, श्री. नंदू चौधरी, श्री. विनोद काटे, श्री. श्रीराम चौधरी, श्री. संदीप देशमुख, श्री. सतीश पाटील, श्री. बाळा भालशंकर, श्री. गणेश बोंडे, श्री. प्रवीण दामोदर, बसरत खान, वहाब खान आणि मुश्ताक मण्यार यांसह तालुक्यातील अन्य प्रमुख कार्यकर्त्यांनी बैठकीत सहभाग नोंदवला.
बैठकीच्या शेवटी, उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांनी आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांचे विचार आणि पक्षाची ध्येयधोरणे तळागाळातील प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्याचा आणि आगामी निवडणुकांमध्ये पक्षाला मोठे यश मिळवून देण्याचा ठाम निर्धार व्यक्त केला.



