बुलढाणा
विवाहिता लहान मुलासह बसस्थानाकावरुन बेपत्ता

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
श्याम पहुरकर
शेगाव । सहा वर्षाच्या लहान मुलासह विवाहिता बेपत्ता झाल्याची घटना उघडकीस आली आहे. तेल्हारा येथील सौ. वैशाली दिगंबर उजवणे (३०) ही विवाहिता १८ नोव्हेंबर रोजी लहान मुलगा कृष्णा उजवणे (६) याच्यासह पिंपळगाव काळे येथे मावशीच्या घरी जाते असे सांगून शेगाव बसस्थानकावर आली. मात्र तेथून ती बेपत्ता झाली. तिचा कुटूंबियांनी सर्वत्र तसेच नातेवाईकांकडे शोध घेतला पण ती मिळून आली नाही. त्यामुळे याबाबत सदर विवाहितेचे पती दिगंबर उजवणे यांनी शेगाव शहर पोस्टेला तक्रार दिली असून यावरून पोलिसांनी हरविल्याची नोंद केली आहे.



