जळगावा जिल्हामहाराष्ट्र

लोकनेते स्व. भाऊसाहेब फुंडकर यांना जयंतीदिनी हजारो चाहत्यांकडून शक्तिस्तळी अभिवादन*

*लोकनेते स्व. भाऊसाहेब फुंडकर यांना जयंतीदिनी हजारो चाहत्यांकडून शक्तिस्तळी अभिवादन*

*खामगाव* ::-

स्टार भारत लाइव एक्सप्रेस बुलडाणा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि ऋषिकेश देठे लोकनेते स्व. भाऊसाहेब फुंडकर यांना जयंतीनिमित्त त्यांच्या शक्तिस्थळ समाधीवर हजारो चाहत्यांनी नतमस्तक होवून अभिवादन केले. शेगांव मार्गावरील सिध्दीविनायक टेक्निकल कॅम्पस येथील स्व. भाऊसाहेब फुंडकर यांच्या शक्तिस्थळ या समाधीस्थळी पहाटे पासूनच त्यांचे चाहत्यांनी गर्दी केली. सर्वप्रथम स्व. भाऊसाहेब फुंडकर यांचे ज्येष्ठ चिरंजीव तथा भाजप महाराष्ट्र प्रदेश सोशल मीडिया संयोजक सागरदादा फुंडकर व आ. अँड. आकाश फुंडकर यांनी लोकनेते भाऊसाहेब फुंडकर यांचे समाधीला पुष्प अर्पण करून अभिवादन केले. नंतर स्व. भाऊसाहेब यांचे पुतळ्याचे पूजन करून पुष्पहार अर्पण करीत नमन केले. यावेळी फुंडकर परिवारातील सदस्य उपस्थित होते. सकापासूनच शहर, जिल्ह्यातील व दूरवरून स्व भाऊसाहेबांच्या चाहत्यांनी गर्दी केली. भाजप सह विविध पक्षाचे पदाधिकारी, उद्योजक, व्यापारी , विविध संस्थेचे अध्यक्ष, संचालक, शेतकरी व गोरगरीब असे सर्व वर्गातील चाहते समाधीला नतमस्तक झाले. अनेकांनी स्व भाऊसाहेब फुंडकर यांचे सहवासातील आठवणींना उजाळा देत असा सर्वसामान्यातला नेता पुन्हा होणे नाही असे अभिवादन करीत उदगार काढले. स्व. भाऊसाहेब फुंडकर अमर रहे, अमर रहे अश्या घोषणा चाहत्यांनी यावेळी दिल्या.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button