नाशिक: पोलिस आयुक्त आपल्या दारी; तक्रारींचे आवाहन

नाशिक (प्रतिनिधी): शंभर दिवसांच्या कृती आरखड्यातंर्गत दि. 05/02/2025 पासुन पोलिस आयुक्त आपल्या दारी या उपक्रमाअंतर्गत पोलिस आयुक्तालयातील १३ पोलिस ठाण्यात अधिकारी नागरिकांच्या भेटीला जाऊन तक्रारी जाणून घेणार आहे. त्याचे जागेवर निरसन केले जाणार आहे. हा उपक्रम दर बुधवारी राबविला जाणार आहे. त्यानुसार पोलिस आयुक्त संदीप कर्णिकः पवन नगर पोलिस चौकी, उपायुक्त मोनिका राऊत राजराजेश्वरी मंगल कार्यालय जेलरोड, चंद्रकांत खांडवी: सप्तशृंगी मंदिर अशोकनगर सातपूर, सहायक आयुक्त पद्मजा बढे कोणार्कनगर आडगाव, नितीन जाधव सराफ बाजार, शेखर देशमुख वडाळा गाव, सचिन बारी मखमलाबाद संदीप मिटके जुने बस स्थानक देवळाली कॅम्प, संगीता निकम कॉलेज रोड पोलिस चौकी, सुधाकर सुरवाडकर विनयनगर चौकी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंकुश चिंतामण जेतवनगर चर्च (बिटको पोलीस चौकी), इरफान शेख चुंचाळे घरकुल योजना या ठिकाणचे कामकाज बघणार आहेत. तरी आपल्या परिसरातील काही तक्रारी असतील तर संबंधीत अधिकारी यांचेशी समक्ष भेटून आपल्या तक्रारी मांडव्यात असे आव्हान करण्यात आलेले आहे.
नाशिक जिल्हा प्रतिनिधी
सागर वैष्णव



