ध्वनीप्रदूषण नियंत्रणासाठी बुलढाणा पोलिसांनी लाऊड स्पीकरवर रात्री दहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत बंदी ,

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
दैनिक. आवाज न्यायाचा
प्रतिनिधी -: प्रशांत चव्हाण
बुलढाणा- (दि.22 सप्टेंबर)
सांस्कृतिक व सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये मोठ्या आवाजात लाऊड स्पीकर, ऍम्प्लिफायर, डॉल्बी साऊंड सिस्टम, आधीचा वापर केला जातो, त्यामुळे नागरिकांना त्रास होण्याची तसेच श्रेष्ठ नागरिक, लहान मुले, विद्यार्थी, आणि आजारी व्यक्तीवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन बुलढाणा पोलिसांनी ध्वनीप्रदूषण नियंत्रणासाठी आदेश जारी केला आहे,
सर्वोच्च न्यायालयाच्या PIL क्रमांक १६/२०२५ मधील ११ सप्टेंबर २०२६ रोजच्या निर्देशाच्या अनुषंगाने हा आदेश जारी करण्यात आला आहे, महाराष्ट्र पोलीस अधिनियम (१९५१) मधील कलम ३६ व ३८ अन्वये पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी बुलढाणा जिल्ह्यात हा आदेश लागू केला आहे. आदेश रात्री १० वाजेपासून सकाळी ६ वाजेपर्यंत सार्वजनिक ठिकाणी ध्वनीक्षेपक , लाऊड स्पीकर, डॉल्बी साउंड सिस्टम, किंवा इतर ध्वनीवर्धक उपकरणांचा वापर करता येणार नाही संबंधित कार्यक्रम आयोजकांना परवानगी घेतल्यानंतरही Noise Pollution (Regulation And Control ) Rules, २००० मध्ये निर्धारित केलेल्या ध्वनी मर्यादेचे पालन करणे बंधनकारक असणार आहे. ध्वनी मर्यादेनुसार औद्योगिक क्षेत्रात दिवसा ७५ डेसिबल व रात्री ७० डेसिबल व्यावसायिक क्षेत्रात ६५ व ५५ डेसिबल, निवासी क्षेत्रात ५५व ४५ डेसिबल अशी मर्यादा आहे.
शांतता क्षेत्रात ध्वनीशेपकाचा वापर करण्यास विशेष निर्बंध असून अशा ठिकाणी ध्वनीप्रदूषण होणार नाही. याची काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, नियमाचे उल्लंघन झाल्यास संबंधित दोन्हीवर्धक उपकरणावर कारवाई करण्याचे अधिकार पोलिसांना देण्यात आले आहेत, ध्वनी प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्यास व दैनंदिन जीवनाचा त्रास होऊ नये तसेच सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी. यासाठी सर्व नागरिक,कार्यक्रमाचे आयोजक, मंडळे आणि संस्थांनी आदेशाचे पालन करावे, असे आवाहन बुलढाणा पोलीस प्रशासनाने केले आहे,



