खानदेशजळगावमहाराष्ट्ररावेर

गणपती विसर्जनासाठी रावेरमध्ये शांतता समितीची बैठक

हिंदू-मुस्लिम समाजातील नागरिकांचा एकोप्याचा संदेश; प्रशासनाला पूर्ण सहकार्याचे आश्वासन

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
रावेर ता. प्रतिनिधी – विकास आमोदकर

रावेर : आगामी गणपती विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर आज २२ सप्टेंबर २०२६ रोजी रावेर पोलीस स्टेशन येथे हिंदू व मुस्लिम समाजातील प्रतिष्ठित नागरिकांची संयुक्त शांतता समितीची बैठक घेण्यात आली.

ही बैठक मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. संदीप गावित यांच्या अध्यक्षतेखाली व मार्गदर्शनाखाली पार पडली. आगामी गणपती विसर्जन मिरवणूक अत्यंत शांततेत, उत्साहात आणि सौहार्दपूर्ण वातावरणात पार पाडण्याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.

गणेश विसर्जनाच्या वेळी कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, तसेच समाजात शांतता, सलोखा आणि एकोप्याचा आदर्श निर्माण करावा, यावर बैठकीत विशेष भर देण्यात आला.

यावेळी हिंदू व मुस्लिम समाजातील उपस्थित नागरिकांनी शांतता व सामाजिक सलोखा कायम ठेवण्याबाबत पूर्ण सहमती दर्शवून प्रशासनाला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

बैठकीस SDPO श्री. अनिल बडगुजर, SDM श्री. काकडे सर, तहसीलदार साहेब, नगरपालिका CEO तसेच SDO MSEB यांच्यासह संबंधित अधिकारी व दोन्ही समाजातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

आगामी गणपती विसर्जन मिरवणूक शांततेत पार पडावी, यासाठी प्रशासनाकडून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येणार असून नागरिकांनीही संयम व सहकार्याची भूमिका ठेवावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

रावेरच्या सामाजिक एकतेचे दर्शन घडवत शांतता, सलोखा आणि बंधुभावाने गणपती विसर्जन पार पाडण्याचा निर्धार या बैठकीत व्यक्त करण्यात आला.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button