गुगळा देवी येथे हिंदू राष्ट्र गणेश मंडळातर्फे वृक्षारोपण

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी – शंकर शिवरकर
देऊळगाव राजा : पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत हिंदू राष्ट्र गणेश मंडळ, देऊळगाव राजा यांच्या वतीने आज गुगला देवी परिसरात वृक्षारोपणाचा उपक्रम राबविण्यात आला.
या उपक्रमास माननीय डॉ. शशिकांत खेडेकर साहेब, श्री. विजय उपाध्ये, श्री. मोरेश्वर मिनासे, डॉ. सुनील कायंदे साहेब, डॉ प्रदीप मिनासे श्री. लोकेश डोणगावकर तसेच मंडळाचे पदाधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते.
पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी वृक्षारोपणाबरोबरच लावलेल्या झाडांचे संगोपन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, असा संदेश यावेळी देण्यात आला. मंडळाच्या वतीने सामाजिक व पर्यावरणपूरक उपक्रम सातत्याने राबविण्याचा संकल्प करण्यात आला.
उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी हिंदू राष्ट्र गणेश मंडळाचे पदाधिकारी व सदस्य यांनी परिश्रम घेतले.



