खानदेशजळगावा जिल्हामहाराष्ट्रमुबईराजकीय

धुरखेडा येथील ३५ कुटुंबांच्या पुनर्वसनाचा तिढा; आमदार खडसेंनी मांडलेल्या अतारांकित प्रश्नानंतर मदत व पुनर्वसन मंत्र्यांचे लेखी उत्तर

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी

रावेर तालुक्यातील धुरखेडा येथील ३५ कुटुंबांचे पुनर्वसन अद्याप प्रलंबित असून, हे काम पूर्ण न झाल्याने ग्रामस्थांनी १५ मे २०२५ रोजी ‘जलसमाधी’ आंदोलनाचा इशारा दिला होता. या गंभीर विषयाकडे आमदार एकनाथ खडसे यांनी विधान परिषदेत अतारांकित प्रश्न मांडून शासनाकडून यावर स्पष्टीकरण व कार्यवाहीची मागणी केली होती.

यावर मदत व पुनर्वसन मंत्री यांनी लेखी उत्तरात स्पष्ट केले की, धुरखेडा येथील बाधित ३५ कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी २६ नोव्हेंबर २०२५ रोजी जळगाव जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत गट क्रमांक ६, १२, १६ व ७१ चे स्थळ निरीक्षण करून अहवाल सादर करण्याचे निर्देश अपर जिल्हाधिकारी जळगाव, उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) जळगाव आणि उपविभागीय अधिकारी फैजपूर यांना देण्यात आले आहेत. मात्र, धुरखेडा येथील ३५ घरांचे ‘विशेष बाब’ म्हणून पुनर्वसन करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या खाजगी शेतजमिनीच्या मालकांचा विरोध असल्याने सध्या हे पुनर्वसन रखडल्याचेही त्यांनी लेखी उत्तरात स्पष्ट केले आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button