बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

धाडी जिल्हा परिषद शाळेत साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी ,

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी-: प्रशांत चव्हाण

बुलढाणा-:(दि 1 ऑगस्ट): धाडी, ता. नांदुरा येथील जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळेत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
धाडी गावाचे सन्माननीय पोलिस पाटील अरुण भाऊ वाकोडे यांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
तर मुख्याध्यापक श्रीकांत वानखडे यांनी अण्णाभाऊंच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या लेखणी आणि शाहिरीच्या माध्यमातून सामाजिक न्याय समता आणि बंधू भावाचा संदेश जनसामान्यापर्यंत पोहोचवला त्यांचे साहित्य आजही समाजाला प्रेरणा देणारे असून नव्या पिढीसाठी मार्गदर्शक ठरणारे आहे, असे मार्गदर्शन मुख्याध्यापक वानखडे सरांनी केले.
विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी पालक व गावातील प्रतिष्ठित नागरिक यांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात लाभली होती,

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button