बुलढाणा

श्री खामगांव महोत्सवात मनोरंजनासह भक्तीची मेजवाणी

श्री खामगांव महोत्सवात मनोरंजनासह भक्तीची मेजवाणी स्टार भारत लाइव एक्सप्रेस बुलडाणा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि ऋषिकेश देठे खामगांव शहरात प्रथमच होत असलेल्या सामुहिक अथर्वशिर्ष पठणाच्या कार्यक्रमास महिलांनी पारंपारीक वेशभुषेत हजारोंच्या संख्येने सहभागी व्हा- आ.ॲड आकाश फुंडकर संरक्षक खामगांव महोत्सव़ समितीखामगांव – श्री गणरायाचे आगमनासोबतच तमाम खामगांव करांसाठी खामगांव महोत्स़व समितीव्दारा दि.18 सप्टेंबर 2023 ते दि.25 सप्टेंबर 2023 पर्यंत खामगांव शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर न.प.मैदान येथे श्री खामगांव महोत्सवाचे आयोजन केले आहे. या महोत्सवात खामगांव करांनी मोठया संख्येत सहभागी होऊन मनोरंजनासह भक्तीचा देखील आस्वाद घ्यावा असे आवाहन खामगांव विधानसभा मतदार संघाचे आमदार ॲड आकाश फुंडकर, सरंक्षक खामगांव उत्सव़ समिती. खामगांव शहरात आयोजित या श्री खामगांव महोत्सवात किर्तनासह, शिवकालीन शस्त्रप्रदर्शनी, संगीत रजनी, एकपात्री प्रयोग, सामुहिक अर्थव शिर्ष पठण, राजा रयतेचा महानाटय शिवराज्याभिषेक सोहळा इत्यादी कार्यक्रमाची बहारदार मेजवाणी रसीक प्रेषकांसाठी आयोजित करण्यात आली आहे. दि.18 सप्टेंबर 2023 ला सायं. 6.00 वा ह.भ.प.श्री निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचे किर्तन, दि.19 सकाळी 10.00 वा श्री गणेश स्थापना, दि.20 सप्टेंबर सायं.7.00 बहारदार संगीत रजनी (म्युझीकल आर्कीस्ट्रा), दि.21 सप्टेंबर श्रीमद भगवत गितेवर निरुपण श्री संजयजी मालपाणी संगमनेर, दि.22.सप्टेबर सायं.4 ते 6 शिवकालीन मर्दानी शस्त्र प्रदर्शनी व प्रात्यक्षीक, दि.23 सप्टेंबर सांय.7.00 श्री सुनिलजी कडासने जिल्हा पोलीस अधिक्षक, बुलढाणायांचे उदबोधन, दि.23 सप्टें रात्रो 8.00वा “साक्षात” जिजाऊ मॉ साहेब- एकपात्री प्रयोगाचा 171 वा प्रयोग, दि.24 सप्टेंबर स.7.00 वा सामुहिक अथर्वशिर्ष पठण, दि.24 सप्टेंबर सायंकाळी 7.00 “राजा रयतेचा महानाटय शिवराज्याभिषेक सोहळा, (हनुमान गणेश उत्सव समिति सती फैल तर्फे) दि.25 सप्टेंबर स.10.00 वा “श्री” गणेश विसर्जन श्री खामगांव महोत्सव़ समितीव्दारा आयोजित. उपरोक्त़ प्रमाणे बहारदार व भक्तीमय कार्यक्रमांची मेजवाणी खामगांवकरांसाठी राहणार असून खामगांव शहरात प्रथमच सामुहिक अथर्वशिर्ष पठणाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. हा कार्यक्रम ऐतिहासीक व्हावा ही खामगांव उत्सव़ समितीची इच्छा आहे. या अथर्वशिर्ष कार्यक्रमास खामगांव शहरातील महिला भगिनींनी पारंपारीक वेशभुषेत हजारोंच्या संख्येने सहभागी होऊन हा कार्यक्रम ऐतिहासिक करावा असे आवाहनही खामगांव विधानसभा मतदार संघाचे आमदार तथा संरक्षक खामगांव महोत्सव़ समिती ॲड आकाश फुंडकर यांनी केले आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button