Uncategorizedखानदेशबुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

देऊळगाव राजा पोलिसांची वरली मटक्यावर कारवाई,मात्र ‘मुख्य बुक्की’ आणि ‘जागा मालक’ अद्याप मोकळेच!

देऊळगावराजा येथे पोलिसांची वरली मटक्यावर धाड; जुन्या पालिका शॉपिंग कॉम्प्लेक्समागे आरोपी रंगेहात अटक!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी ;शंकर शिवरकर

स्थानिक नागरिकांकडून ‘रेड झोन’ घोषित करून पोलीस चौकी उभारण्याची मागणी; जागा मालक आणि मुख्य बुक्कीवरील मेहेरबानीमुळे पोलिसांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह.

देऊळगाव राजा :येथील जुन्या नगर पालिका शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या पाठीमागे सुरू असलेल्या अवैध वरली मटका जुगारावर देऊळगाव राजा पोलिसांनी शनिवारी (दि. २५) दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास छापा टाकला. या कारवाईत एका आरोपीला रंगेहात अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून रोख रकमेसह मटक्याचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, जुन्या पालिका शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या मागे अवैध वरली मटका जुगार सुरू असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस हेडकॉन्स्टेबल माधव नारायण कुटे (ब.नं. १२०२) यांनी पंचांसमक्ष या ठिकाणी छापा टाकला. या छाप्यात वैभव सुरेश शेळके (वय २७, रा. अमृत नगर, देऊळगांव राजा) हा लोकांकडून वरली मटक्याचे आकडे लिहून घेत जुगार खेळताना आणि खेळवताना रंगेहात आढळून आला. पोलिसांनी त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्याकडे २७० रुपये नगदी, वरलीचे आकडे लिहिलेला कागदाचा तुकडा, कार्बन पेपर आणि एक डॉट पेन असा एकूण २८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.याप्रकरणी पोहेका माधव कुटे यांच्या तक्रारीवरून आरोपी वैभव शेळकेविरुद्ध देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात कायमी अपराध क्रमांक ३४५/२०२५, कलम १२ (अ) मुंबई जुगार कायदा (मुजुका) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक फौजदार नायबराव मोगल (ब.नं १७१६) यांनी या गुन्ह्याची नोंद केली असून, पोलीस निरीक्षक (पोनी) यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल भास्कर सानप (ब.नं १८३६) करत आहेत.परिसर बनला ‘रेड झोन’; नागरिकांमध्ये संतापदरम्यान, जुना नगरपालिका परिसर आणि मुख्य बाजारपेठ परिसरात मोठ्या प्रमाणावर अवैध वरली मटक्याची दुकाने थाटली गेली आहेत. या भागात वारंवार विविध गुन्हे घडत असल्याने स्थानिक नागरिक आणि व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी आता हा परिसर ‘रेड झोन’ घोषित करावा आणि येथे कायमस्वरूपी पोलीस चौकी उभारण्यात यावी, अशी आग्रही मागणी केली आहे.मुख्य बुक्की मालक आणि जागा मालक सुरक्षित का?देऊळगाव राजा पोलिसांनी आतापर्यंत अनेक लहान-सहान कारवाया केल्या आहेत. मात्र, ज्या जागेवर हा अवैध धंदा वर्षानुवर्षे चालतो, त्या जागा मालकावर आणि हा मटका चालवणाऱ्या मुख्य ‘बुक्की मालकावर’ (Main Kingpin) पोलीस कोणतीही कारवाई करत नसल्याचे समोर आले आहे. पोलिसांच्या या ‘आस्तेकदम’ धोरणामुळे आणि केवळ आकडे लिहिणाऱ्या एजंटवर कारवाई होत असल्याने स्थानिक पोलिसांच्या एकूण कामकाजावर आणि भूमिकेवर नागरिकांनी तीव्र प्रश्न ? उपस्थित केले आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button