विदर्भसामाजिक

पुरोगामी पत्रकार संघाच्या शेगांव शहर अध्यक्षपदी संजय सुरवाडे यांची नियुक्ती ..

(स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी शेगाव मिलिंद चराटे)

शेगांव येथील शासकीय विश्रामगृहात रविवार दिनांक ( 28 ) रोजी पुरोगामी पत्रकार संघ भारत या पत्रकार संघटनेच्या शेगांव शहराच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या निवडी संस्थापक अध्यक्ष विजय सुर्यवंशी यांच्या आदेशाने संपन्न झाल्या असून या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे राज्य उपअध्यक्ष विष्णू कंकाळ, हे होते तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी किरण मोरे विदर्भ अध्यक्ष होते . कार्यक्रमाच्या सुरुवातीस उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून सन्मान करण्यात आला त्यानंतर उपस्थित प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र देऊन मार्गदर्शन करण्यात आले . पुरोगामी पत्रकार संघाच्या शेगांव शहर अध्यक्षपदी संजय सुरवाडे यांची नियुक्ती करण्यात आली. शेगांव तालूका अध्यक्षपदी आंनद जवजांळ यांची नियूक्ती करण्यात आली.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button