जळगांव शहरातील नागरी वस्तीत दुषित पाणी कसे?

शहरातील सुप्रीम कॉलनीत कादिरनगर मधे भंगार प्लॅस्टिक वर केमिकल प्रक्रिया केली जाते.प्लॅस्टिक विरघळून उर्वरित केमिकल डर्टी वाटर तेथेच जिरवले जाते.हे पाणी जमिनीत झिरपून जवळपास चे सर्वच विहीरी व बोअरपंप,हॅन्डपंप ला हेच पाणी वर येते.येथील भागात महानगरपालिकेचा अद्याप कोणतीही पाणीपुरवठा योजना नाही.काही आर्थिक सक्षम लोक टॅंकरचे पाणी विकत घेतात.पण सर्वच लोक विकत घेऊ शकत नाहीत.हेच पाणी वापरतात.
येथील नगरसेवक चंदू भापसे , तरूण सलीम काकर व मित्र यांनी पितळी हंडा दाखवला.त्याला या पाण्याचे डाग पडलेत.काही पोरांची माणसांची चामडी दाखवली.त्यावर चामडी चे गंभीर आजार झालेले दिसतात.
जळगाव शहरातील रहिवासी वस्तीत असा प्रकार होणे खूप गंभीर आहे.जळगावचे मनपा आयुक्त विद्या गायकवाड , कलेक्टर अमन मित्तल यांनी या गंभीर प्रकिराची दखल घेणे आवश्यक आहे.जळगाव महानगरपालिकेत आरोग्य अधिकारी आहेत.शहरात भूगर्भ जल संशोधन अधिकारी आहेत.तरीपण हे चालतेच कसे?
आतापर्यंत जरी कोणाचे लक्षात आले नसले तरी आम्ही जळगाव जागृत जनमंच ने ही बाब लक्षात आणून देत आहोत.मानवी हानीकारक धंदे शहरापासून दूर नेले पाहिजे.नाहीतर कलेक्टर, आयुक्त, आरोग्य अधिकारी असून नसून काय उपयोग?
…. शिवराम पाटील
महाराष्ट्र जागृत जनमंच
जळगाव



