दुष्काळी परिस्थितीत दानकर्त्यांनी मुख्यमंत्री सहायता निधी मध्ये योगदान देण्याचे केंद्रीय युवा कार्य व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांचे आवाहन!!!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस,
संग्रामपूर तालुका प्रतिनिधी,
रतन भगत.
दि२९/९/२६ सविस्तर वृत्त असे की महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये निर्माण झालेल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय युवा कार्य व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी नागरिकांना मुख्यमंत्री सहायता निधीत आपल्या इच्छेनुसार किंवा क्षमतेनुसार योगदान देण्याचे आवाहन केले आहे. पावसाची कमतरता पाण्याची टंचाई आणि त्याचा शेतीवर होणारा परिणाम यामुळे शेतकरी व शेतमजूर आणि ग्रामीण कुटुंबासमोर फार मोठ्या प्रकारचे आव्हान निर्माण झाले आहे. दुष्काळाच्या कठीण परिस्थितीमध्ये शासनाच्या पाठीशी उभे राहणे ही सर्व जनतेची सामूहिक जबाबदारी असल्याचे रक्षा खडसे यांनी म्हटले आहे. याच भावनेतून आपण मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये योगदान देत असून महाराष्ट्रातील नागरिक उद्योजक व्यापारी सामाजिक संस्था स्वयंसेवी संस्था तसेच सक्षम व्यक्तींनी आपापल्या क्षमतेनुसार मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये योगदान देऊन दुष्काळग्रस्त बांधवांना आधार व्हावा असे सुद्धा आव्हान त्यांनी केले आहे.
याच भावनेतून आपण मुख्यमंत्री सहायता निधी मध्ये योगदान देत असून महाराष्ट्रातील नागरिक उद्योजक व्यापारी सामाजिक संस्था स्वयंसेवी संस्था तसेच सक्षम व्यक्तीने आपापल्या क्षमतेनुसार मुख्यमंत्री सहायता निधीत योगदान द्यावे. आपला अन्नदाता संकटात असताना त्याच्या पॉलिसी उभे राहणे हे आपले सामूहिक जबाबदारी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारकडून दुष्काळग्रस्त भागांसाठी आवश्यक मदत व उपायोजना करण्यात येत असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. शासनाच्या प्रयत्नांना समाजाच्या सहभागाची जोड मिळाल्यास संकट ग्रस्त शेतकरी आणि ग्रामीण कुटुंबांना शेतमजुरांना अधिक आधार मिळू शकतो असेही त्या म्हणाल्या. मदत किती मोठी आहे यापेक्षा संकटाच्या काळात आपण आपल्या बांधवांच्या पाठीशी कसे उभे राहू शकतो ही भावना अधिक महत्त्वाची आहे. आपल्या क्षमतेनुसार केलेला छोटासा प्रयत्नही हातभारही एखाद्या शेतकरी कुटुंबासाठी मोठा आधार ठरू शकतो असे रक्षा खडसे यांनी म्हटले. दुष्काळाच्या या कठीण परिस्थितीमध्ये समाजातील प्रत्येक घटकाने आपल्या परीने मदतीचा हात पुढे करावा आणि दुष्काळग्रस्त शेतकरी शेतमजूर व ग्रामीण कुटुंबाच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहावे असे आवाहन केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी केले आहे.



